• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fifa World Cup 2026 Final मधील पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये दंगली, हजारो लोकांची पोलिसांवर दगडफेक

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा विश्वचषक 2026 फायनल सामन्याचा थरार काल पार पडला. मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असणार असे म्हटले जात होते त्यामुळे त्याने विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा मेस्सीच्या चाहत्यांना होती. पण निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. फिफा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाचा पराभव झाल्याने चाहत्यांना तो धक्का सहन झाला नाही. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक खेळत होता, पण त्याला सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकता आली नाही. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समधील ओबेलिस्कजवळ चाहत्यांची गर्दी झाली आणि तिथे थोड्याचवेळात दंगाजनक परिस्थिती झाली, जमावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांना ढालींचा वापर करावा लागला. घटनास्थळावरील फोटोंमधून धूर निघताना दिसत होता, जे जाळपोळीचे संकेत देत होते.

सामन्यानंतर स्पेन आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच संघर्ष झाला. स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करून फिफा विश्वचषक 2026 जिंकला. सामन्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू मैदानावरच भिडले. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंद्रो पारेडेस पराभवानंतर आपला संयम गमावून बसला आणि स्पॅनिश खेळाडूंशी भांडताना दिसला. अंतिम शिट्टीनंतर अर्जेंटिनाचा डिफेंडर नाहूएल मोलिनाने एका स्पॅनिश खेळाडूच्या पोटात ठोसा मारला. दरम्यान, मिडफिल्डर पारेडेस स्पेनच्या एरिक गार्सियाचा गळा पकडून त्याला ढकलत असल्याचे दिसले, ज्यामुळे अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक स्कालोनी यांना हस्तक्षेप करावा लागला.

गार्सियासोबतच्या वादाव्यतिरिक्त, पारेडेसने गावीला जमिनीवर ढकलले, त्याच्या चेहऱ्यावर धक्का दिला आणि बार्सिलोनाच्या 21 वर्षीय मिडफिल्डरला आपल्या बुटाने मारल्याचे दिसले. त्याच वेळी, मोलिनाने रोड्रीला ठोसा मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे स्पॅनिश कर्णधाराला थांबावे लागले आणि त्याने रागाने अर्जेंटिनाच्या डिफेंडरला जाब विचारला.

अर्जेंटिनावर आणखी एका लाजिरवाण्या कृत्याचा आरोप झाला तो म्हणजे विश्वचषक पदके स्वीकारताना स्पॅनिश खेळाडू विश्वविजेत्यांकडे पाठ करून उभे राहिले. टॉकस्पोर्टच्या एका अहवालानुसार, इंग्लंडचे दिग्गज स्टुअर्ट पिअर्स अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अर्जेंटिनाचे खेळाडू ट्रॉफी स्वीकारताना पाहत होते. पिअर्स म्हणाले, “जेव्हा स्पेन आपली ट्रॉफी उचलणार होते, तेव्हा अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफी सोहळ्याकडे पाठ करून उभे राहिले.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in