• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 स्पर्धेत गोलचं वेगवान शतक, 68 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

June 21, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या यजमानपदापासून आतापर्यंत या स्पर्धेत बरेच विक्रम नोंदवले आणि मोडले गेले आहेत. आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. या स्पर्धेत वेगाने 100 गोल मारले गेले आहेत. आतापर्यंतच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची शतकी कामगिरी ठरली आहे. तर मागच्या 68 वर्षातील सर्वात वेगवाने 100 गोलची सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वात वेगवान गोल शतक हे 1954 साली नोंदवलं गेलं आहे. तेव्हा अवघ्या 20 सामन्यात 100 गोलची नोंद झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 36 सामन्यात 100 गोल मारले होते. 1982 मध्येही 36 सामन्यात 100 गोल मारले गेले होते. तर 1978 साली अर्जेंटिना आणि 1994 मध्ये युएसएमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील 38 सामन्यात 100 गोल मारले गेले. त्यानंतर यंदाच्या पर्वात अवघ्या 33 सामन्यात 100 गोल मारल्याची किमया घडली आहे.

नेदरलँड जर्मनी सामन्यात 100वा गोल

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 33 वा सामना नेदरलँड आणि स्वीडन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात 100 गोल मारला गेला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील 33 सामन्यात 100 गोल मारले गेले. अर्थात प्रत्येक सामन्यात जवळपास 3.09 गोल मारले गेले. या 100 गोलमध्ये 7 आत्मघातकी स्वगोल आहेत. तर जर्मनी आणि कुरासाओ यांच्यात सर्वाधिक गोलचा सामना खेळला गेला. या सामन्यात एकूण 8 गोल मारले गेले. हा सामन्यात जर्मनीने कुरासाओला 7-1 ने पराभूत केलं होतं. कॅनडाने कतारला 6-0 ने नमवलं होतं. तर नेदरलँडने स्वीडनला 5-1 ने मात दिली होती. या सामन्यात या स्पर्धेतील 100 गोलची नोंद झाली होती.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला आणि 100 गोल

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडला. हा सामना 12 जून रोजी झाला होता. या सामन्यात मेक्सिकोच्या ज्युलियन क्विनोनेसने पहिला गोल मारला. सामना सुरू झाल्यानंतर आठव्या मिनिटाला हा गोल मारला गेला. मेक्सिकोनो हा सामना 2-0 ने जिंकला होता. तर 33 व्या सामन्यात नेदरलँडने स्वीडनला 5-1 ने मात दिली. पण या सामन्यातील नेदरलँडच्या कोडी गॅक्पोने मारलेला दुसरा गोल स्पर्धेतील 100 गोल ठरला. या 100 गोलपैकी 46 गोल हे पहिल्या हाफमध्ये, तर 54 गोल हे दुसऱ्या हाफमध्ये मारले गेले आहेत. दुसऱ्या हाफमधील 30 गोल हे शेवटच्या 15 मिनिटात मारले गेले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in