• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार

July 15, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्पेनने जबरदस्त कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत स्पेनने बलाढ्य फ्रान्सला 2-0 ने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच स्पेनच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पेनने अंतिम फेरीत धडक मारल्याने त्याचं कनेक्शन आता टीम इंडियाशी जोडलं जात आहे. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल की नेमकं काय आहे कनेक्शन? हल्ली ज्योतिष, अंकशास्त्र आणि यापूर्वी घडलेल्या साधारण सारख्याच गोष्टींमुळे एक अंदाज बांधला जातो. खरं तर त्याचा वास्तवाशी संबंध नसतो. पण एखादी भुतकाळात घडलेली घटना पुन्हा तशीच घडली तर मात्र त्याचं कनेक्शन जुळवण्याची संधी सोडत नाही. स्पेनने अंतिम फेरी गाठल्याने भारताला तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे संकेत मिळत आहे. कारण यापूर्वी असं घडलं आहे. कसं काय ते जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्डकप, स्पेन आणि टीम इंडिया कनेक्शन

स्पेनने 2010 मध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर भारताने 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावलं होतं. म्हणजेच 2010 नंतर झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने जेतेपदाला गवसणी घातली होती. आता तसंच काहीसं समीकरण जुळून आलं आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनने धडक मारली आहे. तर पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 रोजी वनडे वर्ल्डकप स्पर्धा आहे. त्यामुळे भुतकाळातील घटनांचा संदर्भ जोडून भारत वनडे वर्ल्डकप जिंकेल असं भाकीत काही जण सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

स्पेनने 2010 मध्ये फीफा वर्ल्डकप जिंकला होता. आता 16 वर्षानंतर स्पेनला पुन्हा एकदा जेतेपदाची संधी चालून आली आहे. जर स्पेनने पुन्हा एकदा जेतेपद मिळवलं तर भारताचं जेतेपदाचं समीकरण जुळून येईल. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनचा सामा अर्जेंटीना किंवा इंग्लंडशी होणार आहे. हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहे. यापैकी विजेता संघ अंतिम फेरीत स्पेनशी सामना करणार आहे. स्पेनचा डिफेंस खूपच चांगला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना गोळ करणं खूपच कठीण जात. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत स्पेनविरुद्ध एकच गोल झाला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in