• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमात

May 25, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदा स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे असून 48 संघ मैदानात उतरणार आहेत. 12 जूनपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू होणार असून तीन देशातील 16 शहरात ही स्पर्धा होणार आहे. एकूण 104 सामने खेळले जाणार असून चाहते आपआपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. असं असताना एका फुटबॉलवेड्या चाहत्यांचं स्पर्धेप्रती असलेलं प्रेम समोर आलं आहे. खरं तर चाहत्याच्या कृतीला वेडेपणाच म्हणावं लागेल. पण एखाद्याला वेड लागलं तर सर्वस्वी पणाला लावतो. असंच काहीसं फुटबॉलप्रेमी अँडी मिल्न याचं आहे. त्याने फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आपल्या संघाला पाठिंबा देण्याासठी प्रत्येक सामन्याचं तिकीट खरेदी केलं आहे. फुटबॉल सामन्यांचं तिकीट खरेदी करण्यासाठी अँडी मिल्न यांना आपलं घर विकावं लागलं.

कोण आहे अँडी मिल्न?

अँडी मिल्न हे निवृत्त शिक्षक आहेत. ते शाळेत मुलांना शिकवायचे. पण त्याचं फुटबॉलप्रेम तिकीट खरेदीवर अधोरेखित झालं आहे. त्यांनी फिफा वर्ल्डकप 2026 तिकीट खरेदीसाठी आपलं घर विकलं. त्यांनी नॉर्थविच येथे असलेलं आपलं घर साडे चार कोटींना विकलं. अँडी मिल्न वर्ल्डकप 2022 मध्येही चर्चेत आले होते. तेव्हा ज्युल रिमेट ट्रॉफीची प्रतिकृती हातात घेऊन दिसले होते. एक फुटबॉल चाहते म्हणून अँडी मिल्न यांचा दहावा विश्वचषक आहे. यंदाही इंग्लंड संघाला पाठिंबा देणार आहे. अँडी मिल्न इंग्लंड संघाचा चाहता आहे. त्यामुळे इंग्लंडचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी आपलं घरही विकलं आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जून 2026 पासून सुरूवात होणार आहे. तर इंग्लंडचा पहिला सामना 18 जून रोजी होणार आहे. हा सामना क्रोएशियाविरुद्ध होणआर आहे. हा सामना डॅलसमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी एडम मिल्न आताच डॅलसमध्ये दाखल झाले आहेत. इंग्लंडच्या गटात क्रोएशिया, घाना आणि पनामा हे देश आहेत. इंग्लंडचा दुसरा सामना 24 जून रोजी घानासोबत, तर तिसरा सामना 28 जून रोजी पनामाशी होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in