• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: अर्जेंटीना पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरणार? नायजेरियासोबत असं आहे कनेक्शन

June 4, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा अर्जेंटीना संघ जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटीनाने फ्रान्सला पराभवाची धूळ चारून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. यंदाही असाच एक योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाही अर्जेंटीना जेतेपदावर नाव कोरेल असं बोललं जात आहे. अर्जेंटीना आणि मेस्सीच्या चाहत्यांना तसंच वाटत आहे. नायजेरिया आणि अर्जेंटीना यांच्यात फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एक योग पुन्हा एकदा जुळून आला आहे. आतापर्यंत फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात तसंच घडल्याचं दिसून आलं आहे. हा योग विचित्र नायजेरियाच्या कामगिरीशी संबंधित आहे.

नायजेरिया संघ जेव्हा जेव्हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अपात्र ठरला, तेव्हा तेव्हा अर्जेंटीनाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण आतापर्यंत नायजेरिया अपात्र ठरणं आणि जेतेपद मिळवणं हे घडलं आहे. यंदाही नायजेरिया संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेत जागा मिळवू शकलेला नाही. नायजेरिया 1978 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. तेव्हा अर्जेंटीनाने उत्कृष्ट कामगिरी करत पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 1986 मध्ये त्याची पुनरावृत्ती झाला. तेव्हाही नायजेरिया संघ अपात्र ठरला होता. त्यानंतर 36 वर्षांनी म्हणजेच 2022 वर्ल्डकप स्पर्धेत नायजेरिया संघ अपात्र ठरला आणि लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं.

अर्जेंटीना वर्ल्डकप मिळवणार का?

अर्जेंटीना यंदा जेतेपद पटकावणार की नाही हे संघाच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. अर्जेंटीना संघ गट जे मध्ये असून स्पर्धेतील पहिला सामना 16 जून रोजी अल्जेरियाविरुद्ध खेळणार आहे. या गात ऑस्ट्रेया आणि जॉर्डन हे संघ देखील आहे. त्यामुळे या गटात टॉपला राहण्याचं आव्हान असणार आहे. दरम्यान, अर्जेंटीनाच्या 2022 वर्ल्डकप विजेत्या संघातील 17 खेळाडूंचा समावेश यंदाच्या संघात आहे. त्यामुळे संघाकडे चांगले अनुभवी खेळाडू आहेत. या संघाचं नेतृत्व लियोनल मेस्सीकडेच आहे.

फिफा विश्वचषक 2026 साठी अर्जेंटिना संघ

गोलरक्षक: एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली, जुआन मुसो.

बचावपटू: गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस ओटामेंडी, लिओनार्डो बालेर्डी, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस टॅगलियाफिको, फॅकुंडो मेडिना.

मिडफिल्डर: जिओवानी लो सेल्सो, लिएंड्रो परेडिस, रॉड्रिगो डी पॉल, एक्क्विएल पॅलासिओस, एन्झो फर्नांडीझ, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर, व्हॅलेंटीन बारको.

फॉरवर्ड्स: लियोनेल मेस्सी, निकोलस गोन्झालेझ, ज्युलियानो सिमोन, लॉटारो मार्टिनेझ, जोस मॅन्युएल लोपेझ, ज्युलियन अल्वारेझ, थियागो अल्माडा आणि निको पाझ.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ, आता पगार थेट…
  • थलपती विजय यांचं विधानसभेत ‘सिनेस्टाइल’ भाषण; ‘ती’ कृती करताच टाळ्यांचा कडकडाट
  • जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?
  • खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!
  • ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील…नेमका निर्णय काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in