• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup: इंग्लंड संघाची सामन्याची बुटं आणि बॉल गेला चोरीला, अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

June 13, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026 England Team Theft: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेची सुरूवात धमाकेदार झाली आहे. पण काही विचित्र घडामोडींमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. अमेरिकेत खेळाडूंना विजा देण्यासोबत त्यांची चौकशी आणि तपास पाहता वादाला फोडणी मिळाली होती. आता आणखी एक विचित्र घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बूट आणि बॉल चोरीची घटना घडली आहे. इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. पण त्यांना बुट आणि बॉल चोरीमुळे विचित्र अनुभव आला आहे. ब्रिटीश मिडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापू्र्वी इंग्लंड संघाचं फ्लोरिडात सराव शिबीर होतं. या सराव शिबिरातून संघ फ्लोरिडाच्या कॅनसस सिटीतन स्वोप सॉकर विलेज कँपमध्ये रवाना झाला होता. खेळाडू या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले. पण सामान घेऊन घेणाऱ्या वाहनात मात्र चोरी झाली.

सामानाची चोरी कधी झाली? पोलिसांनी काय केलं?

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंड संघाचं सामना घेऊन येणारं वाहन जेव्हा कॅनसस सिटीत दाखल झालं तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण गाडीत असलेले खेळाडूंचे कस्टमाइज सामन्याची बूट, अधिकृत मॅच बॉल्स, ट्रेनिंग किट्स यासारख महत्त्वाचं सामान गायब झालं होतं. रिपोर्टनुसार, गाडीत जितकं सामान होतं त्यापैकी फक्त एक फुटबॉल तेवढा शिल्लक होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. कॅनसस सिटी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून काही जणांना अटक केली आहे. कॅनसस पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितंल की, प्रकरणाचा वेगाने तपास केला जात आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे इंग्लंड फुटबॉल असोसिएशननेही या प्रकरणाची गंभीर घेतली आहे. तसेच तपास यंत्रणासोबत सामानाची शोधाशोध सुरू केली आहे.

इंग्लंडचा पहिला सामना कधी?

इंग्लंड संघ एल गटात असून त्यांचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार 18 जूनला होणार आहे. हा सामना क्रोएशियाविरुद्ध आहे. पण या सामन्यापूर्वी सामान चोरीला गेल्याने थॉमस टुशेलचा संघ अडचणीत आला आहे. या सामन्यापूर्वी व्यवस्थापन पर्यायी व्यवस्था आणि नव्या बुटांच्या शोधात आहे. कारण या सामन्यापूर्वी खेळाडूंचं साहित्य असेल तर आणि तरच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करता येईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in