• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA 2026: ब्राझील वाचला, जर्मनी-नेदरलँडचं आव्हान संपुष्टात! राउंड ऑफ 32 मध्ये असं घडलं

June 30, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर राउंड ऑफ 32 बाद फेरी सुरू आहे. या फेरीत दिग्गज संघांनी हजेरी तर लावली, पण या फेरीतून पुढे जाताना दिग्गज संघांचा अपेक्षाभंग झाला. काही संघ तर थोडक्यात वाचले. त्यामुळे ही स्पर्धा अतितटीची आणि हृदयाचे ठोके वाढवणारी आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीला अनेक दिग्गजांनी आणि भाकीत वर्तवणाऱ्यांनी नेदरलँड संघाला जेतेपदासाठी पसंती दिली होती. पण त्यांचं आव्हान राउंड ऑफ 32 मध्येच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत फासे उलटे पडले असं म्हणायला हरकत नाही. ब्राझील संघ थोडक्यात वाचला. तर जर्मनी आणि नेदरलँडचं आव्हान राउंड ऑफ 32 मध्येच संपुष्टात आलं आहे.

जेतेपदाचा मानकरी असताना नेदरलँड धक्का

नेदरलँडने साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही. त्यामुळे राउंड ऑफ 32 मध्ये मोरक्कोविरुद्ध आरामात जिंकेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. शूटआऊटमध्ये मोरोक्कोने नेदरलँडला बाहेरचा रस्ता दाखवला. दोन्ही देशातील सामना 1-1 ने बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या सामन्याचा निकाला पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. या खेळीत मोरक्को संघ सरस ठरला. मोरक्कोने 3-2 ने नेदरलँडला मात दिली आणि पुढच्या फेरीत जागा मिळवली.

चार वेळा जेतेपद मिळवणारा जर्मनी संघ आऊट

जर्मनी आणि पॅराग्वे संघाचही तसंच आहे. दोन डाव संपल्यानंतर 1-1 अशी बरोबरी राहिली. त्यामुळे शूटआऊटमधून सामन्याचा निकाल लावणं भाग होतं. पण यात पॅराग्वेने बाजी मारली. जर्मनीने 3-4 असा सामना जिंकला. त्यामुळे जर्मनीचं राउंड ऑफ 16 मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं. या विजयासह पॅराग्वेने या स्पर्धेत मोठा उलटफेर केला.

ब्राझील विजय, पण जापानने दिली कडवी झुंज

राउंड ऑफ 32 मध्ये ब्राझील आणि जापान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या ब्राझील संघाला चांगलाच घाम गाळावा लागला. जपानने पहिलाच गोल करत ब्राझीलवर आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना ब्राझील गमावते की काय असं वाटलं होतं. पहिल्या डावात जापानने 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यामुळे गोल बरोबरी साधण्याचं मोठं आव्हान होतं. ब्राझीलने या सामन्याच्या 56 व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली. पण विजयासाठी चांगलीच झुंज द्यावी लागली. अतिरिक्त वेळेत म्हणजेच या सामन्याच्या 95व्या मिनिटाला ग्रॅबियल मार्टिनेली याने गोलं मारला आणि सामना 2-1 ने जिंकला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास
  • मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
  • सुपरस्टार हिरो, 13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! रिक्षात ओढलं, हॉटेलमध्ये नेलं अन्… पुढे थरकाप उडवणारं घडलं!
  • मुंबईत भयंकर अनर्थ! मोठं झाड स्कुल बसवर कोसळलं, एका चिमुकल्याचा मृत्यू, 10 मुलं गंभीर, नेमकं काय घडलं?
  • Shashank Singh: पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या शशांक सिंहवर नोकराचे गंभीर आरोप, मारहाण आणि…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in