• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ferran Torres Story: कोण आहे फोरेन टोरेस? FIFA वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये एका गोलने स्पेनला बनवलं चॅम्पियन

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये स्पेनचा डंका पाहायला मिळाला. न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनने अर्जेटिनाला 1-0 ने पराभूत करून फुटबॉलचा सर्वात मोठा किताब जिंकला आहे. या संपूर्ण सामन्यात 90 मिनिटात कोणताही गोल झाला नव्हता. परंतु अतिरिक्त वेळेत संपूर्ण सामना फिरला आहे. स्पेनच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सामन्यात 106 व्या मिनिटाला निको व्हिलियम्सने बॉक्सच्या आतून जबरदस्त हेडर मारला. त्यानंतर फेराननने अचूक टायमिंग साधत फुटबॉल गोल केला. हा गोल गेमचेंजर ठरला. या गोलने स्पेनला विश्वविजेता बनवलं. गोल झाल्यानंतर स्पेनचे समर्थक आनंदाने उड्या मारू लागले. तर अर्जेंटिनाचे खेळाडू एकमेकांकडे पाहतच राहिले. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्पेनने शेवटच्या सामन्यातही संयमी खेळी दाखवली. या संयमी खेळीमुळे स्पेन विजयी झाला.

कोण आहे फेरान टोरेस?

फेरान याचा 29 फेब्रुवारी 2000 रोजी स्पेनच्या फोइओस येथे जन्म झाला. फेरान टोरेसचा आता समावेश स्पेनच्या दिग्गज फुटबॉलपटूच्या यादीमध्ये झाला आहे. फेरान हा फॉरवर्ड आणि विंगर या दोन्ही स्तरावर खेळू शकतो. त्याचा वेग, ड्रिब्लिंग, दोन्ही पायाची खेळण्याची क्षमता जबरदस्त आहे. आज तो बार्सिलोना आणि स्पेनच्या राष्ट्रीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचा हा प्रवास भरपूर संघर्षमय होता.

सहा वर्षांचा असताना केली खेळाला सुरुवात

फेरान टोरेस सहा वर्षांचा असताना प्रसिद्ध फुटबॉल अकादमी जॉइन केली. त्यानंतर 2016 साली व्हेलेंसियाच्या बी संघात वरिष्ठ खेळाडूमधून एन्ट्री केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी ए टीमध्ये स्थान मिळालं. पुढे 2017 साली ला लीगामध्ये डेब्यू केलं. या स्पॅनिश लीगमध्ये 2000 सालानंतर खेळणारा पहिला फुटबॉलपटू बनला.

2019 साली त्याने चॅम्पियन लीगमध्ये पहिला गोल केला. व्हॅलेन्सियाचा सर्वात कमी वयाचा सर्वात तरुण चॅम्पियन लीग गोल करणारा खेळाडू ठरला. त्याने क्लबसाठी कमीत कमी 50 ला लीग सामने खेळण्याचा विक्रम केला. त्याने चांगल्या कामगिरीमुळे युरोपच्या अनेक मोठ्या क्लबची नजर होती. त्यानंतर 2020 साली पेप गार्डियोलामध्ये मॅन्चेस्टर सिटीच्या टीममध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी त्याने पहिल्याच सीझनमध्ये प्रीमियर लीग आणि ईएफएल कप जिंकला.

चॅम्पियन लीगमध्ये सलग तीन सामन्यात गोल करणारा सर्वात तरुण वयाचा स्पॅनिश खेळाडू ठरला. न्यूकॅसल विरोधातही पहिली हॅट्रिक गोल केला. त्यानंतर त्याच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली. पुढील काही वर्षात बार्सिलोना संघाशी 5.5 कोटी युरोचा करार केला. त्याने जानेवारी 2022 साली अधिकृतरित्या क्लब जॉइन केला. त्याचा क्लबशी 2027 सालापर्यंत करार आहे. फेरानने स्पेनच्या ज्युनियर संघाचंही नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वात 2017 साली 17 वर्षाखालील युरोपियन चॅम्पियन बनला. त्याने 2019 मध्ये 19 वर्षाखालील युरो कप जिंकला. त्यानंतर फायनलमध्ये दोन गोल केले. पुढे त्याने 2020 साली वरिष्ठ संघात पदार्पण केलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in