• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : तुमच्याही घरात आहेत या चार वस्तू? तर मग आजच बाहेर फेकून द्या, भाग्यामध्ये ठरतात सर्वात मोठा अडथळा

June 14, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन प्रमुख घटकांवर काम करतं, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील या दोन गोष्टींवरच अवलंबून असतं. फेंग शुईनुसार आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात, ज्या तुमच्या भाग्यातील मोठा अडथळा ठरू शकतात. या गोष्टींमुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ऊर्जा संतुलन बिघडते आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो. या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा केवळ तुमच्या आर्थिक स्थितीवरच होत नाही, तर तो तुमच्या मनावर देखील होतो. तसेच यामुळे काहीही कारण नसातना पती-पत्नीमधील नातेसंबंध देखील खराब होऊ शकतात. घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच घराबाहेर काढल्या पाहिजेत, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तुटलेलं घड्याळ – फेंग शुई शास्त्रामध्ये घरात तुटलेलं किंवा खराब झालेलं घड्याळ असणं हे अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार घड्याळाचा संबंध हा गतीशी असतो. घड्याळाला तुमच्या प्रगतीचं प्रतिक देखील मानलं जातं. अशा स्थितीमध्ये जर तुमच्या घरात तुटलेलं घड्याळ असेल तर त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, त्यामुळे तुटलेलं घड्याळ कधीही घरात असू नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

तुटलेली भांडी – तुमच्या घरात असलेली भांडी ही तुमच्या आर्थिक समृद्धीचं तसेच अन्नधान्याच्या विपुलतेचं प्रतिक मानली जातात. त्यामुळे घरात कधीही तुटलेली भांडी असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर अशी भांडी तुमच्या घरातील असतील तर ती भांडी घरातून काढून टाकावीत असं फेंग शुई मध्ये म्हटलं आहे.

फाटलेले चप्पल बूट – फेंग शुईनुसार घरात कधीही फाटलेले किंवा फार जुने चपला बूट ठेवू नयेत, यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या येऊ शकतात. तसेच कर्ज देखील वाढतं असं फेग शुईमध्ये म्हटलं आहे.

फाटलेले कपडे – फेंग शुईनुसार तुमच्या घरात किंवा कपाटात कधीही फाटलेले कपडे असू नयेत, तसेच कधीही फाटलेले कपडे परिधान करू नयेत, यामुळे तुमच्या तुमच्या आयुष्यात येणार्‍या सुख समृद्धीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक
  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल
  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in