• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fatty Liver Day 2026: फॅटी लिव्हर आणि कॅन्सरदरम्यान संबंध, डॉक्टरांनी सांगितले उपाय…

June 11, 2026 by admin Leave a Comment


दरवर्षी जून महिन्याच्या गुरुवारी ‘ग्लोबल फॅटी लिव्हर डे’ साजरा केला जातो. भारतात बहुतांशी लोक फॅटी लिव्हरचा आजाराचा त्रास सुरु आहे आणि अनेकांना या आजाराचा थांगपत्ता लागत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. दिल्ली स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटने ( डीएससीआय ) स्पेअर सोसायटी सोबत मिळू ग्लोबल फॅटी लिव्हर डेचे आयोजन केले होते. यात सांगितले गेले की कशा प्रकारे फॅटी लिव्हरचा आजार कॅन्सरकडे जाऊ शकतो. या वेळी फॅटी लिव्हर आजाराचा वाढता प्रकार आणि याचा लिव्हर कॅन्सर, विशेष रुपाने हेपेटोलेलुलर कार्सिनोमा ( एचसीसी ) या आजारांशी असलेला संबंधाप्रति जारुकता वाढवण्यावर विशेष लक्ष पुरवण्यात आले.

फॅटी लिव्हर आजची सर्वात मोठी समस्या

यावेळी प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तसेच हेपेटोलॉजी तज्ज्ञ डॉ.नरेश अग्रवाल यांनी सांगितले की मेटोबोलिक डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसिज (एमएएफएलडी)ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. जर वेळी निदान आणि उपचार केला तर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना रोखता येते. फॅटी लिव्हर रोगाचे व्यवस्थापन, आव्हाने आणि नवीन उपचार पद्धती यावर देखील डॉक्टरांनी यावेळी चर्चा केली.

फॅटी लिव्हर आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या लिव्हर रोगांपैकी एक आहे. जर वेळीच निदान, चांगली आरोग्य शैली आणि मेटाबोलिक जोखीम कारकांवर प्रभावी नियंत्रण मिळवले तर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर सारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणावर विजय मिळवता येईल. यासाठी जागरुकताच हे याच्या प्रसारास रोखण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे डीएससीआयच्या विभागाध्यक्ष गॅस्ट्रोएटेरोलॉजीस्ट डॉ.पंकज त्यागी यांनी सांगितले.

फॅटी लिव्हर आणि लिव्हर कॅन्सरमध्ये कनेक्शन

संशोधनात हे स्पष्ट होत आहे की फॅटी लिव्हर रोग आणि लिव्हर कॅन्सरचा परस्पर खोल संबंध आहे. त्यामुळे जागरुकता, नियमित स्क्रीनिंग आणि वेळीच हस्तक्षेपाची गरज आधीपासून आता अधिक वाढली आहे. आरोग्य संस्थांची लोकांना आरोग्य साक्षर करण्याची त्यांना योग्य जीवनशैलीसाठी प्रेरित करण्याची जबाबदारी असल्याचे दिल्ली स्टेट कँसर इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. सविता अरोडा यांनी सांगितले.

फॅटी लिव्हर आणि लिव्हर कॅन्सर यांचा संबंध शोधून आम्ही आरोग्य कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता दोघांना त्याच्या लिव्हर आणि आरोग्याप्रती अधिक सजग आणि सक्रीय बनवण्यासाठी प्रेरित करु इच्छीतो असे हॉस्पिटलचे सह संचालक डॉ. रविंदर सिंह यांनी सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीच्या माध्यमातून रोगांच्या अनेक केसेसना रोखता येऊन पहिल्याच स्टेजला ठीक केले जाऊ शकते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in