• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

July 22, 2026 by admin Leave a Comment


Farmer Loan Waiver First List : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीची चर्चा होती. जून महिन्याच्या शेवटपर्यंत या कर्जमाफीचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार होता. या कर्जमाफीचे नियम काय असतील, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी सरकारने काही नियम जाहीर केले होते. याच नियमांवर आक्षेप घेतल्यामुळे कर्जमाफी लाबंली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तशी अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु सरकारने काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचेही सांगितले आहे.

शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात

राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि दिवगंत नेते अजित पवार यांची जयंती आहे. हेच निमित्त साधून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीुसार या योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची भरीव तरतुद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना आणल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच राज्यातील ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातील५५३ शेतकऱ्यांना २ कोटी ९९ लाख ५४० इतक्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. याद्या अपलोड होत केल्या जात आहे. लवकरात लवकर उर्वरीत शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची रक्कम मिळेल, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही?

दरम्यान, आता राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा केला जात असला तरीही सरकारने आता काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असे सांगितले आहे. बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी प्राप्तिकर भरात त्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लभा दिला जाणार नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
  • मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..
  • कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
  • Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
  • Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्…; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in