• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Farmer Loan Waiver: कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ

July 23, 2026 by admin Leave a Comment


Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात यादी जाहीर केली. त्यात 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून अद्याप आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झालेली नाही. सध्या इतक्याच शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. तरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

533 पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ

पहिल्या यादीतील पात्र 533 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. त्यासाठी सरकारने 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. सध्या या यादीत ठाण्यातील सर्वाधिक 182, लातूरमधील 133, पुणे 85, अमरावती 58, सातारा 38, सोलापूर 21, नागपूरमधील 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने इतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक

लवकरच पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. या याद्या ऑनलाईन पाहता येतील. ग्रामपंचायत तथा बँकेच्या सूचना फलकावर त्या चिकटवण्यात येतील. यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्र अथवा इतर सुविधा केंद्रावर जात आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. या दोन्ही प्रक्रियेनंतर खात्यावर पैसे जमा होऊन जुनी थकबाकी वळत करण्यात येईल. सहकार खात्याने निधी वितरीत करण्याविषयी शासन निर्णय जाहीर केला आहे.

अशी करा ॲग्रीस्टॅक नोंदणी

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आधार कार्ड, आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, 7/12 उतारा, बँक खात्याची माहिती आणि पीक कर्ज याचा तपशील द्यावा लागतो. Farmer Registry या पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकायचा. मोबाईलवरील ओटीपी टाकून पडताळणी करायची ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शेतकऱ्यांना स्वतःची व शेताची माहिती द्यावी लागते. एकदा दिलेली माहिती योग्य आहे की नाही याची खातरजमा झाल्यानंतर अर्ज सबमिट करता येतो. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती घरबसल्या करता येते. अडचण असल्यास जवळील सेवा केंद्राची मदत घेता येईल.

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा

महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या 12 लाख लाभार्थी शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार

त्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त 4395 कोटींची तरतूद केली आहे

अगोदरचे 36585 कोटी आणि 4395 कोटीं अशी एकूण 40,980 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल.

राज्यातील एकूण 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यात येणार आहे

नियमित कर्ज फेडणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल

30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका मिळून 53 बँकांकडून महाआयटी पोर्टलवर माहिती अपलोड



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
  • मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..
  • कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
  • Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
  • Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्…; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in