• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Esha Deol : 12 वर्षांनी मोडला भरला संसार, इशा देओल म्हणाली – मी सिंगल नाही..

June 10, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशा देओल ही देखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आली. तिचं करिअर फार यश्सवी ठरलं नाही, पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती बरीच चर्चेत असते. भरत तख्तानी याच्याशी इशाने 2012 साली लग्न केलं, पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र नातं तुटल्यानतंरही ते बऱ्याचदा एक्रत्र दिसले होते.

गेल्या महिन्यातच इशा देओल आणि तिचा पूर्व पती भरत तख्तानी या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, दोघेही एकत्र पार्टी करताना दिसले. त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र आता इशाने तिच्या पूर्व पतीशी असलेलं नातं, त्यांची जवळीक याबद्दल भाष्य केलं आहे. राध्या आणि मिराया या दोन्ही मुलींसाठी आम्ही दोघं (इशा आणि भरत) एक टीम म्हणून एकत्र काम करतो, असं तिने नमूद केलं.

मी सिंगल नाही..

बॉम्बे टाइम्सशी बातचीत करताना इशा देओल हिने तिच्या आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं. भरतशी घटस्फोट झाल्यावर आयुष्य कसं आहे, हेही तिने सांगितलं. ” आम्ही दोघं मिळून आमच्या मुलांचा सांभाळ करत आहोत” असं इशा म्हणाली. आपल्या पूर्व पतीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना ईशा म्हणाली, “मी असं म्हणेन की, जरी मी ‘सिंगल’ (एकटी) असले, तरी मी स्वतःकडे ‘सिंगल मदर’ (एकटी आई) म्हणून पाहत नाही.”

” देवाच्या कृपेने, आमच्या मुलींच्या संगोपनाच्या बाबतीत भारत आणि मी पूर्णपणे एका टीमप्रमाणे काम करतो. आम्ही एक कुटुंब आहोत आणि आमची मुले हीच आमच्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असतील. आम्हाला त्यांना प्रेम व आधार द्यायचा आहे आणि त्यांच्यासाठी नेहमीच एक भक्कम आधारस्तंभ म्हणून उभं राहायचं आहे” असंही इशाने सांगितलं.

12 वर्षांनी मोडलं लग्न

ईशा देओल आणि भरत तख्तानी हे एकेकाळी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं होतं. पण त्यांचं वैवाहिक नातं फक्त 12 वर्षं टिकलं. 2012 साली त्यांनी लग्न केलं पण 2024 मध्ये ते विभक्त झाले. इशा आणि भरत यांची मोठी मुलगी राध्या हिचा जन्म ऑक्टोबर 2017 मध्ये झाला, तर दुसरी मुलगी मिराया हिचा जन्म जून 2019 साली झाला. घटस्फोटानंतरही या जोडप्यामध्ये कोणताही कटुता नाही; ते आजही अगदी चांगल्या मित्रांसारखे राहतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in