• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

EPFO Interest Rate: आनंदाची ढगफुटी! PF खात्यात येणार व्याज, जाणून घ्या केव्हा मिळणार पैसा

July 2, 2026 by admin Leave a Comment


EPFO Interest Rate 2026: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 7 कोटी खातेधारांसाठी आनंदवार्ता आणली आहे. ईपीएफओ उद्यापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी खात्यात (PF) व्याजाची रक्कम जमा करणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारने 8.25 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. माहितीनुसार, पुढील 15 दिवसांच्या आता कोट्यवधि सदस्यांच्या सक्रिय खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पीएफ खात्यात व्याजाची रक्कम येण्याची प्रतिक्षा होती. व्याज जमा झाल्यानंतर खातेदार EPF पासबुकमध्ये वाढलेली रक्कम तपासू शकतात.

आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दर

मोदी सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याजदर देण्याचे ठरवले. वित्त मंत्रालयाने ईपीएफओने निश्चित केलेल्या 8.25 टक्के व्याजदराला मंजूरी दिली. आता उद्यापासून ईपीएफओ सदस्यांच्या बँक खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. 2 मार्च 2026 रोजी ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने (CBT) व्याजदर जाहीर केला होता. त्यानंतर मंजूरीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात आला होता. आता या व्याजदराने व्याजाची रक्कम पीएफ खात्यात जमा होईल.

व्याजदर कसा होतो निश्चित?

EPF योजना 1952 चा नियम 60 नुसार, व्याज मोजण्यासाठी एका निश्चित पद्धतीचा वापर होतो. व्याजाची रक्कम केंद्र सरकार आणि सीबीटीनं निश्चित केल्यानंतर जमा करण्यात येते. मासिक चालू रक्कमे, शिल्लकी आधारे ईपीएफ व्याज काढलं जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवसापासून ते लागू होतं. व्याज मोजण्यासंबंधी काही नियम आहेत.

Umang App वर सेवा

ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा देते. ईपीएफओ ठळकपणे पीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय या सेवा पुरवते. ईपीएफओच्या या सेवा महत्वपूर्ण आहेत. तुम्ही सहजरित्या या सेवांना ट्रॅक करु शकता. त्यासाठीची प्रक्रिया पण अत्यंत सोपी आहे. ईपीएफओने अनेक सेवा Umang App वर उपलब्ध करुन दिल्या आहेत.

असे तपासा बॅलेन्स

तुमच्याकडे युएएन क्रमांक नसला तरी काळजीचे कारण नाही. ईपीएफओकडे तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असतो. तुम्ही या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 011-229014016 यावर मिस्ड कॉल देऊन पीएफमधील बँलेन्स तपासू शकता.

तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पासबुक सेवा, UMANG ॲप अथवा मिस्ड कॉल वा SMS सेवेच्या माध्यमातून खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे पाहता येते. व्याजाची रक्कम एकाचवेळी सर्व खात्यात जमा होणार नाही. काही खात्यात ही रक्कम जमा होण्यास वेळ लागेल. .



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in