• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : 3 सामने-16 खेळाडू, वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर, पहिला सामना केव्हा?

July 3, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात सध्या टी 20i मालिका (England vs India T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. त्याआधी इंग्लंडच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडने इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी (India Tour Of England 2026) टीम जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

3 सामने आणि 1 मालिका

उभयसंघातील या एकदिवसीय मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर 19 जुलैला तिसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा 16 जुलैला होणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच मुख्य संघात अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये जोफ्रा आर्चर, जेकब बेथल, बेन डकेट आणि विल जॅक्स यांचा समावेश आहे.

इंग्लंड-इंडिया वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 जुलै एजबेस्टन, दुपारी साडे 3 वाजता

दुसरा सामना, 16 जुलै कार्डीफ, संध्याकाळी साडे 5 वाजता

तिसरा आणि अंतिम सामना, 19 जुलै, लॉर्ड्स, दुपारी साडे 3 वाजता

टीम इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट आणि जोश टंग.

दरम्यान टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी 21 जून रोजी घोषणा केली होती. शुबमन गिल या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं या मालिकेतून पुनरागमन होणार आहे. तसेच अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडीही खेळताना दिसणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी इंग्लंड-इंडिया एकदिवसीय मालिका ही पर्वणी असणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल,अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in