• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

El Nino : एल निनोचा राक्षस पावसाला गिळून घेणार, IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज आला!

June 15, 2026 by admin Leave a Comment


El Nino Prediction : देशावर सध्या एल निनोचं महासंकट आहे. या एल निनोमुळेच देशात मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही उशिराने मान्सून दाखल झाला. अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कोणतीही घई न करता चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारकडून सांगितले जात आहे. सोबतच दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, आता एली निनोच्या महासंकटाविषयी नवा आणि चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. आयएमडीच्या प्रमुखानीच याविषयी सविस्तर सांगितले आहे.

एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम

एल निनो या जून महिन्याच्या सुरुवातील प्रशांत महासागरात सक्रिय झाला आहे. नव्या अंदाजानुसार आता एल निनोचा प्रभाव सप्टेंबर महिन्यानंतर जास्त वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी याविषयी माहिती दिली आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान…

डॉ. महापात्र यांच्या मतानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा राहील. त्यानंतर एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. हवामान विभागाचे याकडे पूर्ण लक्ष आहे. सोबतच जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान विभागाकडून शेतकरी तसेच सामान्यांना माहिती देत राहू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे…..

दरम्यान, डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे. ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बियाणांची अपलब्धता, जलव्यवस्थापन, पर्यायी पिके यावर सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in