• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Eknath Shinde : मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या दोन खासदारांची नावं आली समोर, शिंदे आज दुपारी दिल्लीत

July 1, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चालींनी सध्या उद्धव ठाकरे गट बेजार झाला आहे. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाचे सहाखासदार फोडले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील आमदार फोडला. त्यामुळे सध्या ठाकरे गटाची वाताहात सुरु आहे. उद्धव ठाकरे एकाबाजूला जोरदार टीका करत असताना दुसऱ्याबाजूने एकनाथ शिंदे जास्त न बोलता ठाकरे गटाला हादरे देत आहेत. आता अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रि‍पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना
  • Todays Gold Rate: वाह! सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव पुन्हा घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी
  • कोण होत्या विजया मेहता? ज्यांनी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना दिलं व्यासपीठ
  • IND vs ENG: श्रेयसला बोलण्याची पद्धत नाही; कर्णधार होताच उर्मटपणा, वैभव सूर्यवंशीबद्दल केलं नको ते विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in