
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाअमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात झाला. या कार्यक्रमात सरत्या आठवणींना उजळा देत नाथाभाऊंनी अनेक गोष्टींना उजळा दिला. त्यांनी राजकारणातील चढउतारावर भाष्य केले. जीवनात आलेल्या कटू प्रसंगातून ते कसे बाहेर आले, यावर त्यांनी मन मोकळं केलं. राजकीय अनुभवावरही ते बोलले. यावेळी त्यांनी कुणावर टीका केली नाही. पण मनातील भावना त्यांच्या चेहऱ्यावर खिळल्या. त्या उपस्थितींना टिपता आल्या. या सोहळ्याला राजकारणातील दिग्गजांची मांदियाळी दिसून आली. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री अरुणाभाई गुजराथी, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. नाथाभाऊंची उभी हयात भाजपमध्ये गेली. या पक्षातील दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित असतील असा अनेकांचा अंदाज होता.
मुक्ताईनगर नमन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. जनतेने मला अनेक वर्ष प्रेम दिलं. 1978 ला पहिल्यांदा निवडणूक लढवली . एक मताने मी त्या वेळेस पडलो. 1990 साली जयंतराव आठवले वळसे यांच्याही संबंध आला विरोधी पक्षात राहून सुद्धा मला सत्ताधारी पक्ष यांनी मला मदत केली. मागच्या काळात विरोधी पक्ष एकमेकांना मदत करायचे मात्र व्यक्तिगत मतभेद तेव्हा नव्हते. अनेक वर्ष मी भाजपच काम. केलं. मात्र राजकारण मध्ये माझ्या काही चढ उतार आले. शरद पवार यांनी मला आसरा दिला मला काही दिवस मागच्या काळात ब्रेक दिला. मात्र शरद पवार यांनी मला उजेडात आणलं.
शरद पवार यांचे आकर्षण
शरद पवार यांचं मला पूर्वी पासून आकर्षण होतं. त्यांनी कृषी दिंडी काढली होती. जळगाव जिल्ह्यातून ही कृषीदिंडी निघाली होती. ही दिंडी नागपूरमध्ये काढण्यात आली होती. मी महाराष्ट्रात मोठं काम केलं असेल तर जलसंपदा विभागाचे काम केले. राजकारणात फेरबदल होत असतात. अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचे काम केले. जीवनात राजकारणात फेर बदल होतात. मला शरद पवारांनी आशीर्वाद दिला. त्यांनी वेळीच साथ दिली नसती तर मी पडद्यामागे पडलो असतो
राजकारण पाहून मला वेदना होतात
स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व मुंडे नाथ भाऊ यांची मैत्री महाराष्ट्राला माहीत आहे. 2000 ते 2014 पर्यंत भाजपचे सरकार नव्हतं, मात्र कार्यक्रमांचा पाया भक्कम होता म्हणून हे भाजपला दिवस आले. प्रमोद महाजन यांनी मला बळकटी दिलं. आताच राजकारण पाहून मला वेदना होतात. प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण आताच राजकारण यात फार बद्दल झालं आहे. मुलगा गेला त्या वेळेस मला परिवाराने साथ दिली. बुलढाणा जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होतात. जामनेर तालुक्यातील शेतकरी तापी पाटबंधारे यामुळे चांगला दिसत आहे. मी कष्ट केले.
मंदिराचा निधी अडवण्याचे पाप मी केलं नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताई मंदिरासाठी निधी मंजूर केला. त्यातील सुरुवातीचा निधी सुद्धा आला. मंदिराचा निधी अडवण्याचा पाप मी आतापर्यंत केलं नाही. सात वर्षापासून मुक्ताई मंदिराला निधी नाही. कोण आलं. कोण गेल यांची मला चिंता नाही मात्र जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी चुकलो असेल तर कुणाला दुखवलं तर चुका सुधारू. वर्षानुवर्षे विधानसभेत मला आपण निवडून दिले. जनतेने मला अनेक वर्ष प्रेम दिले.
खडसे सक्षम विरोधी पक्षनेते
एकनाथ खडसे यांचा 1990 मध्ये विधिमंडळात प्रवेश झाला. एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष वाढण्यासाठी मेहनत घेतली. खडसे यांना विधान परिषद मध्ये थांबवणे फार जिकरीच होतं. एकनाथ खडसे यांचा आवाज फार चढा होता समोरच्याचा आवाज ऐकू येत नव्हता. सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून एकनाथ खडसे यांनी काम करून दाखवलं. जलसंधारणात देखील खडसे यांनी कामं केलं. ते ज्या पक्षात होते त्या पक्षाची प्रचंड त्यांनी सेवा केली. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर कुठलही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रवास केला. खडसे हे शतायुषी व्हावे. रोहिणीताई, रक्षा ताई त्यांच्या राजकीय वारसा पुढे नेत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
सरकारवर तुटून पडणारा नेता
सरकारवर तुटून पडणारा नेता म्हणजे नाथाभाऊ होय. संघर्षमय नेता आहे. एकनाथराव खडसे यांचा परिचय महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. 1990 ला आम्ही विधानसभेत एकच वेळेस निवडून आले. विधानसभेचे अध्यक्ष असताना ते विरोधी पक्ष नेते होते फार आक्रमक संभाषणा करायचे. रक्षा खडसे रोहिणी खडसे हे पुन्हा समाजसेवेत आले आहे. तुम्ही शरद पवार यांचा आदर्श ठेवला पाहिजे. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Leave a Reply