• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि..

July 16, 2026 by admin Leave a Comment


E20 इंधनाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी E20 साठी आग्रही आहे. इथेनॉल इंधनाचा अनेकांनी विरोध केला. विविध चर्चा याबाबत सध्या सुरू आहेत. E20 इंधनाचा पुरवठा देखील सुरू आहे. याबात आता कोर्टान पहिल्यांदाच मोठे आदेश दिली आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथील ग्राहक न्यायालयाने वाहनमालकाच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात कार मालकाचा आरोप होता की, E20 इंधनामुळे त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. वारंवार त्याने दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून समस्या काही सुटत नव्हती. उलट सतत दुरूस्ती केल्याने अधिकचे पैसे लागले. गाडी मालकाचे म्हणणे होते की, मी माझ्या गाडीत E20 इंधन टाकल्यापासून मोठ्या समस्या निर्माण झाल्या. इंजिनवर त्याचा परिणाम झाला आणि मिसफायरिंग तसेच यासोबतच मायलेजही कमी झाले. गाडी वारंवार दुरूस्तीसाठी दिली पण समस्या काही कमी झाली नाही.

ज्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्याचा दावा वारंवार गाडी मालकाकडून करण्यात आला. वाहन उत्पादक आणि विक्रेत्याने असा दावा केला की, संबंधित वाहन मॉडेल E20 इंधनासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. वाहनातील बिघाडांसाठी मालकच जबाबदार होता. कारण हा बिघाड अयोग्य देखभाल आणि वापरामुळे झाला.

पण कोर्टाने थेट गाडीच्या मालकाला दिलासा दिला. कारण गाडी मालकाचे म्हणणे होते की, ही गाडी 2024 मध्ये खरेदी केली होती, त्यावेळी गाडी व्यवस्थित चालत होती. मात्र, E20 इंधन टाकल्यापासूनच गाडीला समस्या सुरू झाल्या. गाडीच्या मालकाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान कोर्टाने कंपनीला आदेश दिला की, तक्रारदाराला 45 दिवसांच्या आत त्याच मॉडेलची कार उपलब्ध करून द्यावी. ही गाडी E20 इंधनावर चालण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर कारची संपूर्ण किमत म्हणजेच 20 लाख 50 हजार परत मालकाला द्यावेत. ही मोठा दणका कंपनीला देण्यात आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in