• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

E20 इंधन विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा, अरविंद केजरीवाल मैदानात, दुपारी..

August 2, 2026 by admin Leave a Comment


E20 इंधनाचा मुद्दा देशभरात गाजत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकार मोठ्या कोंडीत अडकले. त्यानंतर आता E20 इंधनाचा वाद वाढला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. केजरीवाल यांच्या मते, या निवेदनावर दोन लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल स्वाक्षरी केल्या आहेत. इथेनॉल विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र आम आदमी पार्टी करत आहे. त्यामध्येच एक नवीन पाऊल उचलण्यात आले. वाहनचालकांचा आरोप आहे की, E20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत आहे. ज्यामुळे त्याच्या मायलेजवर परिणाम होत आहे. आता थेट नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा निघणार आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, जंतर मंतर सोडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांनी केलेले आंदोलन अनेकांना आवडले नाही. सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत. पेट्रोलचा दर 125 होईल, असे सरकारकडून सांगितले जात आहे. तर E20 स्वस्ता मिळेल.

नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, इंधनाबाबत अधिक न्याय्य धोरणाची मागणी करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. 200000 लोकांनी यावर स्वाक्षरी केल्याचेही त्यांनी म्हटले. लोकांनी इथेनॉल वापराच्या विरोधात या मोहिमेत सहभागी होऊन ऑनलाईन पद्धतीने स्वाक्षरी केली.

पुढे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, मी त्या स्वाक्षऱ्यांच्या प्रती काढून घेतल्या आहेत. मंगळवारी 4 तारखेला दुपारी 12 वाजता, मी स्वतः पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन ती याचिका त्यांना सुपूर्द करणार आहे. त्यामुळे आता नीट पेपरफुटीनंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात E20 इंधनाच्या मुद्द्यात मोर्चा काढला जात आहे. यावेळी स्वत: अरविंद केजरीवाल या मोर्चाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in