• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drishyam 3: रेकॉर्डब्रेक ओपनिंग करणार ‘दृश्यम 3’, पण अजय देवगणला सोसावं लागणार नुकसान?

May 21, 2026 by admin Leave a Comment

साऊथपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या फ्रँचाइजीने धुमाकूळ घातला आहे. 2013 मध्ये सर्वांत आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचं हिंदीत रिमेक झालं आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला. आता 'दृश्यम 3' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला मूळ 'दृश्यम 3' हा चित्रपट 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी विविध मुलाखतींमध्ये स्पष्ट केलंय की तिसऱ्या भागासोबतच या चित्रपटाची कथा ते संपवणार आहेत.

'दृश्यम 3'ची धमाकेदार अॅडव्हान्स बुकिंग झाली असून मल्याळम इंडस्ट्रीत ओपनिंगचा नवीन रेकॉर्ड बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे अजय देवगणचा हिंदी रिमेक 'दृश्यम 3' येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मल्याळम हे दोन्ही व्हर्जन एकच कहाणी सांगतात. त्यामुळे मोहनलाल यांचा 'दृश्यम 3' इतक्या लवकर प्रदर्शित करणं हा अजयच्या रिमेकसाठी नुकसानकारक ठरू शकतं असं म्हटलं जात आहे.

'दृश्यम 3'ची धमाकेदार अॅडव्हान्स बुकिंग झाली असून मल्याळम इंडस्ट्रीत ओपनिंगचा नवीन रेकॉर्ड बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे अजय देवगणचा हिंदी रिमेक 'दृश्यम 3' येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मल्याळम हे दोन्ही व्हर्जन एकच कहाणी सांगतात. त्यामुळे मोहनलाल यांचा 'दृश्यम 3' इतक्या लवकर प्रदर्शित करणं हा अजयच्या रिमेकसाठी नुकसानकारक ठरू शकतं, असं म्हटलं जात आहे.

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार गुरुवारी सकाळी प्रदर्शनापूर्वी 'दृश्यम 3' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 35 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं. भारतात आणि परदेशातही या चित्रपटाची तगडी डिमांड आहे. त्यामुळे ओपनिंग कमाईचा आकडासुद्धा मोठा असेल अशी शक्यता आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 55 ते 60 कोटी रुपयांची कमाई करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी प्रदर्शनापूर्वी 'दृश्यम 3' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 35 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं. भारतात आणि परदेशातही या चित्रपटाची तगडी डिमांड आहे. त्यामुळे ओपनिंग कमाईचा आकडासुद्धा मोठा असेल, अशी शक्यता आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 55 ते 60 कोटी रुपयांची कमाई करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मल्याळम इंडस्ट्रीत  सर्वाधिक ओपनिंगचा रेकॉर्ड मोहनलाल यांच्या 'एम्पुरान' (2025) या चित्रपटाच्या नावे आहे. या चित्रपटाने 70 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर ममूटी आणि मोहनलाल यांचा 'पेट्रियट' (2026) आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…
  • मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in