• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Donald Trump : कारण आम्ही मूर्ख होतो, अनेक वर्ष भारताने..डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा आरोप

June 5, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच व्यापार करार होणार आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ त्यासाठी भारतात आलं होतं. दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक चर्चा झाली असं भारताच्या व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर टॅरिफच्या मुद्यावरुन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आरोप केला आहे. “भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा उचलला. अमेरिकी सामानावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला पण स्वत: काही दिलं नाही” ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती आता बदलली आहे. अमेरिका भारताकडून भरपूर पैसा कमावत आहे.

व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मी भारताला दोष देणार नाही. मी आपल्या लोकांना दोष देईन. कारण आम्ही मूर्ख होतो. अनेक वर्ष भारताने अमेरिकेचा फायदा उचलला. त्यांनी आमच्यावर भरपूर टॅरिफ लावला. पण स्वत: काही दिलं नाही. आता स्थिती उलटी आहे. आम्ही भारताकडून भरपूर पैसा कमावतोय” मंगळवारी अमेरिकेने अनेक देशांवर नवीन अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव दिला. यात 10 टक्के आणि 12.5 टक्के टॅरिफ लावला जाऊ शकतो. 60 देशांमधून जे सामान येतं, फोर्स्ड लेबर द्वारे बनवलं जात असल्याचा दावा अमेरिकी सरकार केला. फोर्स्ड लेबर म्हणजे मनाविरुद्ध जबरदस्तीने मजुरीच्या कामाला जुंपलं जातं.

या यादीत भारत सुद्धा

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने 54 देशांची लिस्ट जारी केलीय. यात भारतही आहे. जबरदस्तीने बनवलेल्या सामानाची आयात रोखण्यासाठी आवश्यक कायदे त्यांनी लागू केलेले नाहीत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, इस्रायल, जपान, कतर आणि रशिया सारखे देश आहेत.

ट्रम्प कधी काय बोलतील याचा नेम नसतो

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत अनेकदा भारत-अमेरिका संबंध ताणले गेले आहेत. याला कारण आहे, डोनाल्ड ट्रम्प यांची बडबड आणि कृती. अमेरिका फर्स्ट धोरण राबवताना ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांसोबत शत्रुत्व ओढवून घेतलं. आज अमेरिकेचे जगातील अनेक देशांसोबत संबंध बिघडलेले आहेत. ट्रम्प कधी काय बोलतील याचा नेम नसतो. कधी ते भारताला मित्र म्हणतात, तर कधी भारताविरोधातच गरळ ओकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in