• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DK Shivakumar Networth: 852 कोटींचा शॉपिंग मॉल, अलिशान घर… डोळे विस्फारणारी संपत्ती आहे कर्नाटकाच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांची

May 28, 2026 by admin Leave a Comment


कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार (DK Shivakumar) हे आता शपथविधी घेणार आहे. सिद्धारमैया सरकार आता पायउतार झाले आहे आणि गुरुवारी दुपारी त्यांनी सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. स्वत: सिद्धारमैया यांनी राजीनाम्या आधी नवे मुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. कर्नाटकचे नवे सीएम म्हणून शपथ घेणारे शिवकुमार यांची गणना सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते. याचा अंदाज त्यांचा गडगंज संपत्ती पाहूनच येतो.

विधानसभा निवडणूक २०२३ च्या दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात डीके शिवकुमार यांनी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी त्यांची संपत्ती (DK Shivakumar Networth) १४०० कोटींहून अधिक सांगितली होती. त्यांच्या नावावर शॉपिंग मॉल सह अनेक महागड्या कमर्शियल प्रॉपर्टीजचा समावेश आहे. तसेच शेअरबाजारातही त्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शिवकुमार यांची मालमत्ता किती ?

कर्नाटकचे होऊ घातलेले सीएम डीके शिवकुमार यांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारणारा आहे. मायनेता डॉट कॉमवर त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती १४१३ कोटी रुपयाहून जास्त आहे. तर त्यांच्यावर ५०३ कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे.

शिवकुमार यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर तमाम बँक खात्यात १६ कोटी रुपयांहून जास्त डिपॉझिट असल्याचे म्हटले आहे. एकूण मालमत्तांना मिळून त्यांनी चल संपत्ती २४४ कोटी आणि कुटुंबियांसह २७३ कोटी रुपये सांगितली आहे. तर त्यांनी त्यांच्याकडे ९७० कोटींची अचल संपत्ती असल्याचे शपथपूर्वक सांगितले आहे. तर कुटुंबियांच्या नावावर सह एकूण ११४० कोटी रुपयांची अचल संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

चार कोटींचे शेअर,कोट्यवधीचे सोने

सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी असलेल्या डीके शिवकुमार यांच्याकडे असलेल्या चल संपत्तीचा विचार करता त्यांनी शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. युनियन बँक ते बँक ऑफ बडोदा पर्यंत, कोस्तुभा प्रोजेक्ट्सपर्यंत व्हीक्रॉस डेव्हलपर्सपर्यंत शेअरमध्ये त्यांनी पत्नीसह ४.२० कोटी रुपये गुंतवले आहेत. याशिवाय त्यांच्या जवळ ९ कोटी रुपयांची एफडी देखील आहे.

सोने – चांदी आणि डायमंडसह अन्य किंमती साहित्यात त्यांच्याकडे Rolex आणि Hublot सारखी घड्याळे असून त्यांची किंमत लाखो रुपये आहेत. डी.के. शिवकुमार आणि त्यांची पत्नी आणि मुलांकडे एकूण ३.२८ कोटींची ज्वेलरी असल्याचे म्हटले जाते.

शिवकुमार यांची अचल संपत्ती

डीके शिवकुमार यांची अचल संपत्ती संदर्भात विचार करता शपथपत्रानुसार त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर ३० कोटी रुपयांची शेत जमीन आहे. डी.के. शिवकुमार याशिवाय ८४ कोटी रुपयांहून जास्त किंमतीची अनेक घरे आणि फ्लॅट आहेत. जे दिल्ली ते बंगलुरु येथे आहेत.

कमर्शियल प्रॉपर्टीजचा विचार करता DK Shivakumar यांच्या नावावर Global Mall असून त्याची किंमत सुमारे ९०० कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्या आणि त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची दुकाने अन्य संपत्ती देखील आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in