• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Divya Bharti : ‘मला वाचवा…’, मृत्यूच्या आदल्या दिवशी दिव्या असं का म्हणालेली? प्रसिद्ध सिलेब्रिटीकडून अभिनेत्रीचे अंतिम शब्द उघड

August 4, 2026 by admin Leave a Comment


Anees Baazmee Revelation About Divya Bharti Last Day : अभिनेत्री दिव्या भारती आज हयात असती तर, तिची जागा कोणतीच दुसरी अभिनेत्री घेवू शकली नसती. दिव्या हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनेयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार कमी कालावधीत दिव्या हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं. पण अभिनेत्री अखेरचा श्वास देखील फार लवकर घेतला. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली. कारण अभिनेत्रीचं निधन होईल अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती, दरम्यान, दिव्याच्या निधनाच्या इतक्या वर्षांनंतर लेखक अनीस बझ्मी यांनी दिव्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या शेवटच्या शब्दांबद्दल लेखकाने मोठा खुलासा केला आहे.

सांगायचं झालं तर, ‘लाडला’ सिनेमातून दिव्या चाहत्यांच्या भेटीस येणार होती. पण त्याआधी तिने अखेरचा श्वास घेतला. अशात दिव्या हिच्यासोबत शुटिंगचा शेवटचा दिवस आठवत अनीस बज़्मी म्हणाले, ‘दिव्याच्या निधनानंतर सिनेमात अनेक बदल करावे लागले… तिच्या निधनाचा सिनेमाच्या टीमला मोठा फटका बसला. 4 एप्रिल रोजी दिव्यासोबत शुटिंग केली आणि दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी कळली…’

दिव्या भारतीसोबतच्या त्या शेवटच्या शॉटची आठवण सांगताना अनीस म्हणतात, “त्या शॉटमध्ये, तोंडाला मुखवटे लावलेले काहीजण तिला ओढत नेत असताना ती कॅमेऱ्यापासून दूर जाते आणि हळूहळू ‘आउट ऑफ फोकस’ होत जाते. त्या सीनमध्ये तिचा शेवटचा डायलॉग होता – ‘मला वाचवा.’ दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला समजलं की तिचे निधन झालं आहे.”, त्यानंतर ‘लाडला’ सिनेमात दिव्याच्या जागी अभिनेत्री श्रीदेवी हिला कास्ट करण्यात आलं.

सांगायचं झालं तर, दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक अफवा पसरल्या आणि तिच्या पतीवर, साजिद नाडियादवालावरही संशय व्यक्त केला गेला. मात्र, तिच्या वडिलांनी कोणताही कट-कारस्थान नसल्याचं सांगितलं . डोक्याला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव हे तिच्या मृत्यूचं अधिकृत कारण सांगण्यात आलं. 7 एप्रिल 1993 रोजी मुंबईत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनीस यांनी सांगितले की, तिच्या निधनामुळे सिनेमाचं काम जवळपास दोन महिने थांबलं होतं.

दिव्या भारती हिच्या निधनानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला देखील फार मोठा फटका बसलेला. तिच्या अंत्यदर्शनाला देखील अनेक सेलिब्रिटी पोहोचलेले.. दिव्या हिच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. पण आजही अभिनेत्रीच्या आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. तर तिची गाणी आजही हिट आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in