
दिशा सालियान प्रकरणात महत्वाची अपडेट आहे. आज उच्च न्यायालायाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात सीबीआयकडे तपास सोपवावा यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयीत या सुनावणीवर त्यांचे वकिल निलेश यांनी माहिती दिली. “आज उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले आहेत की, सतीश सालियान यांची जबानी नोंदवून त्याआधारे एफआयर नोंदवा. ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावे असतील त्यांच्याविरोधात कारवाई करावी” “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर आम्हाला प्रोटेस्ट याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल” असं वकिल निलेश यांनी सांगितलं.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply