• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 3 : हमजाच्या कथेत नवा ट्विस्ट, ‘धुरंधर 3’बद्दल राकेश बेदींचा मोठा खुलासा; आता रणवीर नाही तर..

April 20, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 3 : ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने यशाचा एक नवा इतिहास लिहिला आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर फ्रँचाइजीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. थिएटरमध्ये ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बघायला गेलेले प्रेक्षक क्लायमॅक्सनंतरही खुर्चीवरच बसून होते. यामागचं कारण म्हणजे दिग्दर्शक तिसऱ्या भागाविषयी काही हिंट देतो का हे पाहणं. सोशल मीडियावर ‘धुरंधर 3’बद्दल बरीच चर्चा झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारलेले अभिनेते राकेश बेदी यांनी त्यावर मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात धुरंधरचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार की नाही, याविषयी त्यांनी सांगितलं आहे.

राकेश बेदी म्हणाले, “मला असं वाटत नाही की ‘धुरंधर’चा तिसरा भाग बनेल. परंतु धुरंधर ही एक फ्रँचाइजी असल्याने तो कधीही दुसऱ्या कलाकारांसोबत बनवला जाऊ शकतो. दुसऱ्या भागाची कथा एका अशा वळणावर येऊन संपते, जिथे गुप्तहेर त्याच्या मायदेशी परततो. माझ्या मते या कथेत आणखी काही उरलं नाही.” राकेश बेदी यांच्या प्रतिक्रियेनंतर हे स्पष्ट झालं आहे की ‘धुरंधर 3’ इतक्यात तरी बनणार नाही. जरी भविष्यात दिग्दर्शक आदित्य धरने तिसऱ्या भागाचा विचार केला तरी तो कदाचित दुसऱ्या कलाकारांसोबत बनवू शकतो, असं त्यांनी म्हटलंय. यामुळे रणवीर सिंहचे चाहते निश्चितच नाराज होणार आहेत.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार कलाकारांची फौज पहायला मिळाली. रणवीर सिंह, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, गौरव गेरा अशी स्टारकास्ट त्यात आहे. प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही हा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने जगभरात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’लाही मागे टाकलं आहे. आता ‘धुरंधर 2’चं पुढचं लक्ष्य आमिर खानचा ‘दंगल’ असणार आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 1747 कोटी रुपयांची कमाई केली होती. हाच रेकॉर्ड आता ‘धुरंधर 2’ने मात्र अवघ्या एका महिन्यात मोडला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील ‘धुरंधर 2’च्या कमाईचा आकडा 1778.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुझ्यात दोष, त्यासाठी….फकीर बाबाच्या कांडने राज्यात खळबळ, महिलांना बेशुद्ध करून…हादरवणारी घटना समोर!
  • अचानक लँडिंग फेल, विमान हवेतच…अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर; प्रवाशांसोबत काय घढलं?
  • सर्जरीनंतरही दीपिकाच्या पोटात दोन नवीन सिस्ट; पती म्हणाला “आता उपचार शक्य नाही..”
  • हेच लोक महिलांना… RSS आणि भाजपचं नाव घेत प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
  • प्रत्येक दिवशी तुमच्या घरी येतात देव? देवाच्या उपस्थितीचे हे आहेत संकेत, आताच लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in