• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हेच लोक महिलांना… RSS आणि भाजपचं नाव घेत प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

April 20, 2026 by admin Leave a Comment


लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनबाबतचे घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाले. सत्ताधाऱ्यांनी यासाठी विरोधकांना जबाबदार म्हटले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकरण करत असल्याचा आरोप केला आहे. अशातच आता सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत या मुद्यावर भाष्य करत RSS आणि भाजपचं नाव घेत मोठा आरोप केला आहे. प्रणिती शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

भाजपचा प्लॅन फेल गेला

खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले की, महिला आरक्षण विधेयक डिलिमिटेशन नावाने आणले. मात्र आधीच 2023 मध्ये महिला आरक्षणाबाबतचे बिल संमत झाले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला महिला आरक्षण आणा अशी मागणी केली होती. मात्र आता दोन राज्यांच्या निवडणुकीसाठी देशाची अखंडता मोडली गेली. असं असलं तरी मोदी आणि शाह यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली. यात 50 टक्के आरक्षणाचा उल्लेख कुठेच नव्हता.

संविधानात छेडछाड करायची होती

पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या की, पहिल्या दिवसापासून ते बॅकफूट गेले. हे महिला आरक्षण बिल नाही तर डिलिमिटेशन बिल आहे हे लक्षात आले. हे सगळे स्क्रिप्टेड होते. काही INDIA आघाडीच्या लोकांना फसवून वळवण्यातीही नीती होती. 2/3 मेजॉरिटी मिळणार नाही हे माहित होतं मग महिलांच्या भावनांशी का खेळला? काही ठिकाणी त्यांना संविधानात छेडछाड करायची होती म्हणून त्यांच्या सेक्रेटरी अधिकारी यांच्याशी त्यांचा वाद झाला होता.

भाजपवर गंभीर आरोप

पुढे बोलताना प्रणिती शिंदे यांनी आरएसएस आणि भाजपवर आरोप करताना म्हटले की, त्यांच्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. देशाच्या अखंडतेचे काही नाही, त्यांना उत्तर आणि दक्षिण वेगळं करायचं आहे. महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही. आज जे हे म्हणतात की काँग्रेस आणि विरोधक महिला विरोधी आहेत, नेमके तेच RSS आतापर्यंत महिलाना तुच्छ वागवतात, त्यांना खालचे स्थान देतात, त्यांना संरक्षण देत नाहीत. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डायबिटीज असणाऱ्यांनी आंबा खावा की नाही? तज्ञ काय सांगतात जाणून घ्या…
  • Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला
  • भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत येणं आवश्यक – मोहन भागवत
  • ‘मैं अपनी मर्जी से कन्वर्ट हुई’, अफवांवर या अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, सांगितलं कारण
  • मोठी बातमी! देशात आणखी एक विमान अपघात, जमिनीवर आदळताच पेट, अनेकांच्या मृत्यूची भीती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in