• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’चा अनकट व्हर्जन, डिलिट केलेले सीनही ‘बीप्स’शिवाय, कुठे येईल पाहता

June 20, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2 Unmuted Version: 2026 मध्ये अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शत आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने मोठे विक्रम रचले. बॉक्स ऑफिसवर तर सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडलं. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाने अनेक विक्रम रचले. मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ‘धुरंधर 2’ सिनेमाचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील बोलबाला पाहायला मिळत आहे… अनेकांनी ‘धुरंधर 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहिला असेल. पण प्रेक्षकांसाठी एक गुडन्यूज आहे… आता ‘धुरंधर 2’ सिनेमाचे अनकट आणि अनम्यूटेड सीन देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तर जाणून घ्या तुम्ही ‘धुरंधर 2’ सिनेमाचे अनकट आणि अनम्यूटेड सीन कोणत्यात ‘बीप्स’ शिवाय कुठे पाहू शकता.

कुठे पाहाल ‘धुरंधर 2’ सिनेमाचं अनकट आणि अनम्यूटेड व्हर्जन

सांगायचं झालं तर, ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) पूर्वी जिओ-हॉटस्टारवर (JioHotstar) उपलब्ध होता, तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षक तो नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहत होते, नेटफ्लिक्सवर त्यांना सिनेमाचा अनकट आणि अनम्यूटेड व्हर्जन पाहता आला. जिओ-हॉटस्टारवरील भारतीय प्रेक्षकांसाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती; मात्र, आता ‘धुरंधर 2’ नेटफ्लिक्स इंडियावर त्याच्या मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे आता भारतीय प्रेक्षकांना देखील ‘धुरंधर 2’ सिनेमाचा अनकट आणि अनम्यूटेड सीन पाहता येणार आहे.

किती भाषांमध्ये पाहू शकता ‘धुरंधर 2’

‘धुरंधर 2’ सिनेमाचे अनकट आणि अनम्यूटेड सीन नेटफ्लिक्सवर पाहता येतील. सिनेमात फक्त हिंदीच नाहीतर, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देखील प्रेक्षकांना पाहता येईल. ‘धुरंधर 2’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अर्जुन हिने महत्त्वाची भूमिका साकारली.

‘धुरंधर’ सिनेमाची कमाई…

‘धुरंधर’ सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित झालेला. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमा रणवीर सिंगने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्याच्यासोबत 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन मुख्य भूमिकेत होती. सिनेमात अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांसारख्या अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकारली. या सिनेमाने जगभरात 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाचा दुसरा पार्ट देखील तीन महिन्यात प्रदर्शित झाला. ‘धुरंधर: द रिवेंज’ म्हणजे सिनेमाच्या दुसऱ्या भागाने देखील चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केले. सिनेमाने भारतात 1150 कोटींची कमाई केली. तर संपूर्ण जगात सिनेमाने 1800 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in