• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Delhi | 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; मात्र जंतरमंतरवर मोठा गोंधळ

July 18, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान मोठी घडामोड घडली आहे. प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यानंतर जंतरमंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषण करत होते. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांचे सुमारे २० किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्याने दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याआधी दिल्ली उच्च न्यायालयात सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून २० जुलै रोजी “चलो संसद” आंदोलनाचे आवाहन केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा केली होती.

या संपूर्ण घडामोडीनंतर विरोधी पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अहवाल आणि आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय
  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in