• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा

June 29, 2026 by admin Leave a Comment


टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती, मात्र 27 जून रोजी पेपरफुटीची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली. आता या परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने तयारी सुरू केली आहे. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली.

पेपरफुटी प्रकरणावर आज विधिमंडळात चर्चा झाली. यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, पेपर विक्रीच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे टीईटीचा प्रश्नपत्रिका आढळून आली. याप्रकरणी भिवंडी-कोनगाव परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात राजू प्रयाग शाम आणि आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मोठी रक्कम घेऊन पेपर विक्री करणार होते, अशी माहितीही तपासातून समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एसआयटी स्थापन केली असून हरियाणा, बिहार आणि दिल्ली येथे तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात मकोका लावण्याबाबतही तपास सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

तसेच, पुढील फेर परीक्षा विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता घेण्यात येणार आहे. भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याची योजना सरकारकडून आखली जात आहे.

दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रश्न उपस्थित केला की, प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. यावर सरकारने परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी समिती नेमण्याचे आणि पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो तुमच्यासोबतही असंच घडलं?
  • Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!
  • जयंत-जान्हवीच्या केमिस्ट्रीबद्दल दिव्या पुगावकरचा नवरा म्हणतो, “मला त्रास होतो, पण..”
  • मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं, धुराचे लोट अन् प्रचंड आवाज..
  • Deepti Sharma World Record : दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in