
DAAYRA Trailer : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या बहुप्रतीक्षित ‘दायरा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा क्राइम-ड्रामा आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर चित्रपट 18 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रिअल लाइफ प्रकरणावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा एका हाय-प्रोफाइल मर्डर केसच्या तपासाभोवती फिरताना दिसणार आहे. आता अखेर ‘दायरा’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 19 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासूनच सस्पेन्स आणि थरार पाहायला मिळतो. एका ट्रकपासून सुरू होणारा ट्रेलर पुढे एका गुंतागुंतीच्या मर्डर केसकडे वळतो. या चित्रपटात करीना आणि पृथ्वीराज दोघेही, पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतील.
हा चित्रपट एका हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या तपासावर आधारित आहे. या प्रकरणाची जबाबदारी दोन डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, जे मिळून या गुंतागुंतीच्या केसचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाचा ट्रेलरही जबरदस्त असल्याचं दिसत आहे.
कसा आहे ‘दायरा’ चा ट्रेलर?
मेघना गुलजारने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट क्राइम-ड्रामा असून जंगली पिक्चर्स आणि पेन स्टूडियोजने तो प्रोड्यूस केला आहे. या चित्रटातून करीना आणि साउथ सिनेमचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमार हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 18 सप्टेंबर 2026 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ट्रेलरमध्ये करीना कपूर खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. ती एका हाय-प्रोफाईल केसचा बारकाईने तपास करत असते.या केसच्या फाईल्स तपासताना ती पृथ्वीराज सुकुमारन याच्या व्यक्तिरेखेवर अनेक प्रश्नही उपस्थित करते.
पृथ्वीराजच्या व्यक्तिरेखेने याआधीही अशाच परिस्थितीचा सामना केला आहे का, याचा शोध करीना घेताना दिसते. त्यानंतर तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो —त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?
या प्रकरणाचा खरा उलगडा कोण करणार, हे ‘दायरा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल. मात्र, या दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांवर कशा प्रकारे वरचढ ठरतात, हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. करीनाला पोलीस ऑफीरच्या भूमिकेत पहायला चाहते नक्कीच खूप उत्सुक आहेत.
Leave a Reply