
यंदा झालेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत एक मोठा उलटफेर पहायला मिळाला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच पक्षांमध्ये सत्तेचा खेळ चालायचा. पण यंदा अभिनेते विजय यांच्या पक्षाने तामिळ राजकारणात चमत्कार केला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विजय यांच्या TVK ने थेट राज्याची सत्ता मिळवली. विजय पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता विजय यांची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. विजय जाहीरपणे यावर बोललेले नाहीत. तामिळनाडूत ‘विजय फॉर प्राइम मिनिस्टर’मोहिम सुरु झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थतता वाढली आहे. तामिळनाडू सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून पर्यटन मंत्री असलेले राजेश कुमार यांनी या कॅम्पेन संदर्भात स्टेटमेंट दिलं आहे. “आघाडीत असताना टीवीकेने राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला नाही, तर आम्ही विजय यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडू”
विजय यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. टीवीकेकडून विजय यांच्या पंतप्रधानपदासंबंधी सतत कॅम्पेन चालू आहे. “2029 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार हे माझं मत स्पष्ट आहे. टीवीकेचं समर्थन मिळणार नसेल तर आम्ही काँग्रेसचं मंत्री कॅबिनेटचा भाग राहणार नाहीत” असं राजेश कुमार म्हणाले. विजय यांच्यासाठी मोहीम सुरु आहे. विजय पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत, असं टीवीकेकडून सतत म्हटलं जातय. टीवीकेचे नेत ए अर्जुन आणि शरद कुमार सतत विजय यांच्यासाठी मोहिम चालवत आहेत. अलीकडेच ‘विजय फॉर पीएम’चे पोस्टर झळकले होते.
टीवीकेची सुद्धा अशी इच्छा नसेल
आतापर्यंत काँग्रेस नेते यावर बोलत नव्हते. कार्ती चिदंबरम म्हणालेले की, ‘हा फॅन क्लबचा माइंडसेट आहे’. राजेश कुमार यांनी आक्रमक इशारा दिला आहे. त्यावरुन ऑल इज वेल नसल्याचं दिसतय. आघाडीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होतेय.’विजय फॉर पीएम’ हे कॅम्पेन 2029 लोकसभा निवडणुकीसाठी आहे कि नाही हे अजूनही स्पष्ट नाहीय. काँग्रेस सध्या पीएम पदासाठी राहुल गांधींशिवाय दुसरा कुठल्याही नेत्याला मान्य करण्याच्या मूडमध्ये नाहीय. तामिळनाडूत नव्याने स्थापन झालेल्या विजय यांच्या सरकारसमोर आघाडी टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. कारण तामिळनाडूत बहुमताचा आकडा 118 आहे. टीवीकेचे स्वबळावर 107 आमदार आहेत. आघाडीत कुठलाही तणाव निर्माण व्हावा अशी टीवीकेची सुद्धा इच्छा नसेल.
Leave a Reply