• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

D-Mart : डीमार्टमध्ये 99 रुपयांना मिळणारी ही वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची उडते झुंबड, कितीही स्टॉक असू द्या, तासाभरात संपतो

August 9, 2026 by admin Leave a Comment


डी – मार्ट म्हणजे ज्या लोकांना शॉपिंगची आवड आहे, अशा लोकांसाठी नंदनवन आहे. डी मार्टचं वैशिष्ट म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू इतर ठिकाणी शोधण्याची गरज भासत नाही, तुमचा वेळ वाचतो. किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंत आणि भांड्यांपासून ते ब्यूटी प्रोडक्टपर्यंत सर्व वस्तू तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. त्यामुळे डी -मार्टमध्ये कायमच लोकांची गर्दी असते. तसेच डी -मार्टमध्ये अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देखील दिली जाते, त्यामुळे या वस्तू दुकानाच्या तुलनेत डी-मार्टमध्ये कमी किंमतीत मिळतात, पैशांची बचत होते, त्यासाठी देखील आजकाल ग्राहक शॉपिंगसाठी डी मार्टचाच पर्याय निवडत असल्याचं पहायला मिळतं.

सुट्टीच्या दिवशी तर डी मार्टमध्ये प्रचंड गर्दी असते. डी मार्टचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे तिथे तुमच्यासाठी एकाच वस्तूच्या अनेक क्वालीटी उपलब्ध असतात. तुम्हाला जी वस्तू हवी आहे, ती तुम्ही थेट हाताने घेऊ शकतात, तुम्हाला तिथे खरेदीचं स्वातंत्र्य मिळतं, त्यामुळे देखील लोक खरेदीसाठी डी -मार्टची निवड करतात.

दरम्यान डी मार्टमध्ये विक्रीसाठी अशा काही वस्तू असतात, खास करून त्या वस्तू खरेदी करण्यासाठीच ग्राहक डी मार्टमध्ये गर्दी करतात. जसं की पावसाळ्यामध्ये डी मार्टमध्ये कमी किंमतीमध्ये आणि आकर्षक स्वरुपाच्या छत्र्या तसेच रेनकोट विक्रीसाठी ठेवलेले असतात, त्यामुळे ग्राहक पावसाळ्यात लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी डी -मार्टमध्ये गर्दी करतात. तसेच हिवाळ्यामध्ये स्वेटर, जेरकिंग अशा वस्तू डी-मार्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात.

परंतु डी -मार्टमध्ये अशा काही वस्तू आहेत, ज्यांची किंमत फार नसते, ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या या वस्तू असतात, त्यामुळे त्या प्रचंड लोकप्रिय होतात. जसं की डी मार्टमध्ये 99 रुपयांना टी शर्ट मिळतो, हा टी शर्ट खरेदी करण्यासाठी या काउंटरवर नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. अनेकदा तर गर्दी एवढी वाढते की, हे टी शर्ट तासा -दोन तासांमध्येच आऊट ऑफ स्टॉक होतात. स्वस्त किंमत असल्यामुळे अनेक जण या टी-शर्टची खरेदी करतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..
  • लिंगबदल करणाऱ्या अनाया बांगरकडून आनंदाची बातमी, अखेर ते स्वप्न पूर्ण होणार; बऱ्याच दिवसांपासून…
  • मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
  • कलाकार असावा तर असा, एका भूमिकेसाठी या अभिनेत्याने 50 दिवस केली नाही अंघोळ, वास येऊ नये म्हणून मारायचा परफ्यूम
  • रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू की घातपात? सर्वात धक्कादायक सत्य समोर; आईमुळे…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in