• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: मीराबाई चानूची गोल्ड मेडलची हॅटट्रीक, कॉमनवेल्थमध्ये रचला इतिहास

July 26, 2026 by admin Leave a Comment

Mirabai Chanu, Commonwealth Games 2026: भारताची वेटलिफ्टिंग स्पर्धक मीराबाई चानू हीने पुन्हा एकदा भारताची मान गौरवाने उंचावली आहे. कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत आपल्या कामगिरीने भारताचा नावलौकिक केला आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेच्या वुमन्स 48 वजनी गटात मीराबाई चानूने जबरदस्त कामगिरी केली. यासह तिने या स्पर्धेत भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. विशेष म्हणजे मीराबाई चानूचं हे या स्पर्धेच्या इतिहासातील सलग तिसरं गोल्ड मेडल आहे. या कामगिरीसह तिने या स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे.

मीराबाई चानूची गोल्डन कामगिरी

ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत मीराबाई चानूने महिलांच्या 48 किलो वजनी गटात एकूण 190 किलोग्रॅम वजन उचलून भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिं. यापूर्वी मीराबाईने 2018 मध्ये गोल्ड कोस्ट आणि 2022 मध्ये बर्मिंघम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. यावेळीही तिने या स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली आणि भारताला पहिलं गोल्ड मिळवून देण्यात योगदान दिलं.

WATCH GAMES RECORD BREAKING LIFT!

– Mirabai Chanu lifted 85kg in Snatch! 🏋 pic.twitter.com/wet8LmN3a6 https://t.co/xcS2ZSpnAh

— The Khel India (@TheKhelIndia) July 26, 2026

नव्या विक्रमासह जिंकलं गोल्ड

मीराबाई चानूने यंदाच्या स्पर्धेत जिंकलेलं गोल्ड मेडल खास आहे. कारण तिने नव्या विक्रमासह या पदकाला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच फेरीत 85 किलो वजन उचललं होतं. हा या स्पर्धेतील आणि कॉमनवेल्थमधील मोठा विक्रम आहे. यापूर्वी क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो वजन उचलून तिने गोल्ड मेडल पक्कं केलं होतं. मीराबाईने या स्पर्धेत अकून 190 किलो वजन उचललं. स्नॅच फेरीची सुरूवात थोडी खराब झाली. पण त्यानंतर कमबॅक केलं आणि दुसऱ्या फटक्यात 82 किलो वजन उचलून स्वत:ला सावरलं. शेवटच्या फटक्यात 85 किलो वजन उचलून तिने कॉमनवेल्त स्पर्धेत एक विक्रम रचला आहे.

कोण आहे मीराबाई चानू?

मीराबाई चानू हीने भारताला अनेक स्पर्धेत पदकं मिळवून दिली आहे. 13 वर्षांची असल्यापासून मीराबाई या स्पर्धेची तयारी करत आहे. आर्थिक स्थितीमुळे सुरूवातीला अडचणीचा सामना करावा लागला. डाएट फॉलो करणंही कठीण होतं. पण तिने त्यावर मात करून आता आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. मीराबाई चानूने 2020 टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in