• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: नीरज चोप्रा अंतिम फेरीत, भारताच्या आणखी दोन खेळाडूंचा पाकिस्तानच्या नदीमशी होणार सामना

July 30, 2026 by admin Leave a Comment


कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील भालाफेकीच्या पात्रता फेरीत नीरज चोप्रासह तीन भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीतून 12 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळणार होतं. त्यात तीन भारतीय खेळाडू आहेत. तर पाकिस्तानच्या अरशद नदीमही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीतून ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, श्रीलंकेचा रुमेश थारंगा पाथिरागे, इंग्लंडचा बेन ईस्ट, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट, नायझेरियाचा चिन्नेचेरेम न्रामदी, बहामासचा किशॉन स्ट्रॅचन, पाकिस्तानचा मोहम्मद यासिर, ऑस्ट्रेलियाचा कॅमरॉन मॅकएन्टायर आणि केनियाचा ज्यूलियस येगो हे पात्र ठरले आहे. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागे याने सर्वात लांब भालाफेक केली. त्याने 82.84 मीटर लांब भालाफेक केली. तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स 81.29 मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर इंग्लंडचा बेन ईस्ट 80.38 मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

नीरज चोप्रा दोन फेकीतच अंतिम फेरीत पोहोचला

पात्रता फेरीत प्रत्येक खेळाडूला तीन थ्रोच्या संधी दिल्या जातात. यात नीरज चोप्राने फक्त दोन फेकीतच आपलं अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं. नीरजने पहिला थ्रो 76.28 मीटर लांब केला. त्यानंतर दुसऱ्या फेकीत त्याने 79.61 मीटर लांब भाला फेकला. त्यामुळे त्याने या फेकीतच पाचव्या स्थानी झेप घेतली होती. त्यानंतर त्याने तिसरी फेक न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या रोहित यादवनेही दोन थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली.तर यशवीर सिंहने तिन्ही थ्रो केले, तिसऱ्या थ्रोमध्ये 78.36 मीटर लांब फेकला आणि फायनलमध्ये स्थान पक्कं केलं. हे तिघेही मिळून भारताकडून फायनलमध्ये पोहोचले आहेत.

अंतिम फेरीचा सामना कधी?

ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत पुरुषांचा भालाफेक अंतिम सामना भारतीय वेळेनुसार 1 ऑगस्ट 2026, शनिवार रोजी मध्यरात्री 12.45 वाजता सुरू होईल. पात्र ठरलेल्या 12 खेळाडूंना अंतिम फेरीत तीन थ्रो करण्याच्या संधी दिल्या जातील. तीन थ्रोनंतर 8 खेळाडूंना पुढची संधी, तर 4 खेळाडू बाद होतील. उर्वरित 8 खेळाडूंमध्ये पुन्हा तीन थ्रो केले जातील. यात रिव्हर्स ऑर्डरमध्ये थ्रो केले जातात. म्हणजे आठव्या क्रमांकावर असलेला खेळाडू पहिला थ्रो करतो, तर पहिल्या क्रमांकावर असलेला खेळाडू सर्वात शेवटी थ्रो करतो. या फेरीनंतर अंतिम विजेता ठरतो. खेळाडूने पूर्ण सहा थ्रो मध्ये नोंदवलेला सर्वात लांब थ्रो अंतिम स्कोअर मानला जातो.

भालाफेक करताना असे असतात नियम

खेळाडूचे नाव पुकारल्यानंतर त्याला भाला फेकण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ मिळतो. थ्रो करताना खेळाडूचा पाय रेषेच्या पुढे गेला किंवा भाला जमिनीवर पडताना त्याचे टोक आधी टेकले नाही, तर तो थ्रो अमान्य ठरवला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in