• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

July 21, 2026 by admin Leave a Comment


CJP Removes Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात सध्या दिल्लीमध्ये मोठो आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. अनेक सिने अभिनेते-अभिनेत्रींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सीजेपीच्या या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी बाकावरील नेत्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधा यांचा राजीनामा मागितला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता सीजेपीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीजेपीच्या या अचानक निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जातेय.

सीजेपीने नेमका काय निर्णय घेतला?

कॉकरोच जनता पार्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीजेपीने विजेता दहिया यांना आपल्या प्रवक्तेपदावरून हटवले आहे. एकीकडे सीजेपीचे दिल्लीत आंदोलन सुरू असताना दुसरीकडे विजेता दहिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विजेता दहिया हे बर्गर घाताना दिसत आहेत. सोबतच ते या व्हिडीओत काही आक्षेप नोंदवत आहेत. याच व्हिडीओमुळे सीजेपीने ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

सीजेपीने निर्णय घेताना काय कारण दिले?

कॉकरोच जनता पार्टीने हा निर्णय घेताना आम्ही विजेता दहिया यांच्या असंवेदनशील कृत्याची निंदा करतो, असेही म्हटले आहे. अशा प्रकारची वागणूक ही स्वीकारार्ह नाही. दहिया यांनी केलेली कृती ही आमच्या विचारांशी सुसंगत नाही, असं सीजेपीने म्हटलं आहे.

We strongly condemn the deeply insensitive actions of our spokesperson Vijeta Dahiya, whose videos surfaced while peaceful protestors and our team were facing brutal police violence. Such conduct is unacceptable, shows a complete lack of judgment, and is wholly inconsistent with…

— Cockroach is Back (@Cockroachisback) July 21, 2026

वाद का झाला?

विजेता दहिया यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ते बर्गर खात असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे सीजेपीच्या आंदोलनात तरुण लाठ्या खात होते. तर दुसरीकडे विजेता दहिया या हे बर्गर खाताना दिसले, असा आक्षेप नोंदवण्यात आला. या आक्षेपानंतर दहिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. मी कोणालाही उत्तरदायी नाही, असं मत त्यांनी मांडले. तसेच माझं बर्गर खाणं आज एवढा चर्चेचा मुद्दा का होत आहे, असा सवालही उपस्थित केला. दरम्यान, आता दहिया यांना सीजेपीने प्रवक्तेपदावरून हटवलं आहे. यावर दहिया यांची प्रतिक्रिया आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in