• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP protest : दिल्लीतील आंदोलनात दगडफेक, आंदोलकांना कोणी भडकवलं? अखेर पोलिसांनी शोधून काढलं, सर्वात मोठी बातमी

August 2, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तब्बल एक महिना दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. मात्र तरी देखील शिक्षण मंत्री राजीनामा देत नसल्याने अखेर कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला, मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

दरम्यान दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेक सरकारी वाहनांचं मोठं नुकसान झालं, तसेच काही खासगी मालमत्तांचं देखील नुकसान झाल्याचं समोर आलं. दरम्यान यावेळी ज्यांनी -ज्यांनी दगडफेक केली त्यांची ओळख पटवण्यात आल्याचा दावा आता पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून सरकारला एक इंटरनल रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, या रिपोर्टनुसार ज्यांनी ज्यांनी दगडफेक केली त्या सर्वांची ओळख फेस रिकग्रिशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून करण्यात आली आहे, ज्यांनी दगडफेक केली त्यातील अनेकांवर आधीच गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांची नोंद आहे, यामध्ये शस्त्र कायद्याचे उल्लंघन, दरोडा, खून, बलात्कार अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ज्यांची ओळख पट‍वण्यात आली आहे, त्यातील दहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान ज्यांनी या मोर्चादरम्यान दगडफेक केली त्यांनी फक्त एकाच जागी दगडफेक केलेली नाहीये, त्यांच्याकडून संसदेपासून दूर दोन किलोमीटर परिसरात विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये दिल्लीतील टॉल्स्टॉय-जनपथ क्रॉसिंग, रेल्वे भवन परिसर, कॅनॉट प्लेस, एलआयसी बिल्डिंगचा परिसर अशा विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती. आता या आरोपींची ओळख पटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in