
CJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला देशातून मोठा प्रतिसाद मिळतोय. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत आहेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणारच, असा निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केलाय. विरोधकांनीही या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा धारण केलाय. अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे निघाले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे आता जंतर-मंतरवरी घडामोडी वाढल्या आहेत. जंतर-मंतरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
जंतर-मंतरवर नेमकं काय घडतंय?
जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक तरुण हे जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेले आहेत. अधून मधून अभिजित दीपके हे आंदोलकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु सध्या जंतर मंतरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक काहीसे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या भागात पोलीसही आक्रमक झाले आहेत. वातावरण चिघळू नये म्हणून जंतर मंतरवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply