• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP : सात तासांची बैठक, हजारो सूचनांचा अभ्यास… CJP चा पुढचा निर्णय काय ? आज करणार मोठी घोषणा

August 6, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणावरून ( NEET paper Leak) आवाज उठवत, जंतरमंतरवर मोठं आंदोलन करण्यात आलं, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामाही झाला. या आंदोलनाच्या माध्यमातून देभरातच नव्हे तर परदेशातही ज्याची दखल घेतली गेली, ज्याची चर्चा झाली, ती म्हणज कॉक्रोच जनता पार्टी(CJP). अभिजीत दीपके संस्थापक असलेल्या या पार्टीशी अनेक तरूण, अनेक आंदोलक जोडले गेले असून, सध्या सर्वत्र त्यांचाच बोलबाला आहे. हीच CJP आता, भविष्यातील त्यांच्या वाटचालीबाबत आणि देशव्यापी विस्ताराच्या आराखड्याबाबत आज ( गुरूवारी) मोठी घोषणा करणार आहे. गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या CJP ने आता देशभर आपलं जाळं विस्तारण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी नवीन रणनीती आखली आहे. त्यामुळे सीजेपीच्या आजच्या घोषणेकडे फक्त महाराष्ट्राचंचं नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथए, अभिजीत दीपकेंच्या निवासस्थानी सीजेपीची बैठक सुरू होती, यादरम्यान बरीच चर्चा झाली, विचारंथन झालं असून आता सीजेपीकडून आगामी वाटचालीचा रोडमॅप जाहीर करण्यात येणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यातून त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘ छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या दोन दिवसांत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा करून आंदोलनाच्या पुढील टप्प्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देशभरातून विद्यार्थी, पालक आणि समर्थकांकडून आलेल्या हजारो सूचना, संदेश आणि मागण्यांचा अभ्यास करून हा रोडमॅप तयार करण्यात आला’, असं रांका यांनी स्पष्ट केलं.

देशव्यापी विस्तारावर भर

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी जवळपास सात तास चाललेल्या बैठकीत CJP च्या विस्ताराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक राज्यात विद्यार्थी संघटनांचे मजबूत नेटवर्क उभारणे, स्थानिक शिक्षणविषयक आंदोलनांना पाठिंबा देणे आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करणे, या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय पक्ष नव्हे, दबावगट म्हणून काम

तसेच, CJP हाराजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार करत नाही, असं बैठकीनंतर अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं होतं. ” देशातील जनतेचा व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि पारंपरिक राजकारणावरील विश्वास कमी होत आहे. त्यामुळे आम्ही सत्तेच्या राजकारणात उतरणार नाही, तर शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर प्रभावी दबावगट म्हणून काम करू,” असं त्यांनी सांगितले.

संघटनेने आपल्या आगामी कामकाजाचा केंद्रबिंदू शिक्षण क्षेत्रालाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, विद्यार्थ्यांचे हित, जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे, या मुद्द्यांवर CJP सातत्याने आवाज उठवणार आहे.

आगामी आंदोलन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित, अहिंसक आणि लोकशाही मार्गानेच पुढे नेले जाईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाशी संलग्न न राहता स्वतंत्र सामाजिक चळवळ म्हणून काम करण्याची भूमिका संघटनेने कायम ठेवली आहे.

आजच्या घोषणेकडे देशाचे लक्ष

CJP च्या मते, पेपरफुटीविरोधी आंदोलनानंतर घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी त्यांच्या लढ्याला नवी दिशा दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या घोषणेत संघटनेचा राष्ट्रीय विस्तार, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीच्या पुढील आंदोलनाची



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in