• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP आणि आम आदमी पार्टीचे कनेक्शन? स्मितहास्य केले, लकाकले डोळे, अरविंद केजरीवाल यांचे थेट उत्तर…

August 11, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीपेजी) मागे आम आदमी पार्टी आणि तिचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आहेत का? अभिजीत दिपके, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीच्या अनेक मोठ्या नेत्यांवर ‘आप’सोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिपके यांनी आपच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केल्याचे यापूर्वी म्हटले आहे. तर एका कार्यक्रमात सीजेपीविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना केजरीवाल यांनी थेट खुलासा केला आहे. त्यांच्या उत्तरामुळे अनेकांच्या मनातील शंका दूर झाली आहे. काय म्हणाले आप प्रमुख?

आमची तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट

अरविंद केजरीवाल यांनी एका पॉडकास्टदरम्यान कॉक्रोच जनता पार्टी आणि आपच्या संबंधावर प्रश्न विचारण्यात आला. सीजेपीच्या वरिष्ठ वर्तुळात तुमच्या पक्षाचे नेते असल्याचा तिरकस सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा अरविंद केजरीवाल यांचे डोळे लकाकले. त्यांनी स्मित हास्य केले. “आमचे तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आमची अकादमी आहे. त्यातून तावून सलाखून अनेक जण तयार होतात आणि पुढे नेते होतात.” असे उत्तर केजरीवाल यांनी दिले.

तर सीजेपीची मंडळी तुमचीच आहे, तुम्हीच हे सर्व घडवून आणलं, असं म्हटलं जातं? या प्रश्नावर त्यांनी खुलासा केला. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, हा काही मुद्दा आहे का? जनता असे म्हणत नाही. माध्यमं आणि भाजप तसं रंगवत आहे. ते पूर्वी आम आदमी पक्षात होते हा मुद्दाच नाही. नीट पेपर फुटला हा खरा मुद्दा आहे. पण ते त्यावर बोलणार नाहीत. टीव्हीवरील वाद विवाद शो मी पण पाहतो. त्यात तुम्ही तर पूर्वी आम आदमी पक्षात होतात. तुम्ही त्या पक्षात होतात. असेच विचारले जाते. मी तर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना सांगणार होतो की, असे विचारणाऱ्यांना सांगा की हो आम्हीचे ते बदमाश आहोत की जे परीक्षा पद्धत ठीक करण्यासाठी आले आहेत. आमचा उद्देश हाच आहे. आम्हाला थोडंच जनतेने निवडले आहे, असा उपरोधिक टोला केजरीवाल यांनी लगावला.

दिपकेंनी ‘आप’ कडे मदत मागितली?

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आपकडे कधी मदत मागितली का? या प्रश्नावर बोलताना, दिपके यांनी कधीच कोणती मदत मागितली नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. ते आम आदमी पक्षात पुन्हा येऊ शकतात का? असा सवाल करण्यात आला. “मला नाही वाटत ते आपमध्ये येतील. राजकारणात येतील किंवा नाही. माझी त्यांच्याशी कधी चर्चा झाली नाही. मला त्यांच्या मनात काय सुरू आहे, त्याची कल्पना नाही” असे केजरीवाल म्हणाले. तर आपण सीजेपीच्या मंचावर गेलो होतो आणि त्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दिल्याचे आपचे प्रमुख म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in