• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJI Surya Kant: लंडनमध्ये सरन्यायाधीशांना विचारला तो प्रश्न… जस्टिस सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ… काय आहे प्रकरण?

June 6, 2026 by admin Leave a Comment


Chaos in CJI Surya Kant lecture at London: ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाषण होते. या कार्यक्रमा दरम्यान काही लोकांनी भारतात लोकशाहीचे दमन होत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमानंतर भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकारावर तीव्र हरकत नोंदवली. सार्वजनिक ठिकाणी काही मर्यादा पाळायचे काही जण विसरतात असे उच्चायुक्तलयाने फटकारले.

AI आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावर विशेष मार्गदर्शन

सरन्यायाधीश सूर्यकांत हे 4 जून रोजी बिर्कबेक कॉलेजमधील कार्यक्रमात सहभागी झाले. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होता. त्यावेळी एका महिलेने देशातील असहिष्णुता आणि लोकशाहीवरील दबावावर प्रश्न विचारला. त्याने हा मुद्दा उचलला. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय अनेक कायदेतज्ज्ञांनी भारतात मतभेद वाढले आहेत. दोन समाजातील वाढत्या शत्रुत्वाविषयी चिंता व्यक्त केली आहे. हाच कल सरन्यायाधीशांच्या भाषणातही दिसला असा आरोप ही महिला करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

pic.twitter.com/tbFLh2MdyC

— India in the UK (@HCI_London) June 5, 2026

कॉकरोच आणि पॅरासाईट वक्तव्यावर टिप्पणी

या दरम्यान या महिलेने सरन्यायाधीशांना त्यांनी नुकत्याच केलेल्या ‘कॉकरोच’ आणि ‘पॅरासाईट’ संबंधीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर सवाल उपस्थित केला. पण आयोजकांनी महिलेला मुख्य विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा यावर प्रश्न विचारण्यास सांगितले. इतर प्रश्नांचा विचार केल्या जाणार नसल्याचे सांगितले.

भारतीय उच्चायुक्तालयाने फटकारले

दरम्यान भारतीय उच्चायुक्तालयाने या सर्व प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीने अति महत्त्वाच्या कार्यक्रमात असा व्यत्यय आणणे योग्य नसल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी वर्तनाच्या मर्यादेचे हे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. लोकशाही देशात मतभेद हे स्वाभाविक आहे. पण भावना सभ्य आणि आदरपूर्वक पद्धतीने व्यक्त झाल्या पाहिजे असे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र, विद्यापीठ आणि सार्वजनिक ठिकाणी संवादाची एक पद्धत असते. तसे वर्तन ठेवणे आवश्यक असते. कोणत्याही कार्यक्रमात अशा पद्धतीने व्यत्यय आणणे चांगल्या लोकशाहीचे निश्चितच लक्षण नाही, अशी टिप्पणीही करण्यात आली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जुलैमध्ये लाँच होणाऱ्या Nothing Phone 4b स्मार्टफोनमध्ये असेल हा खास Snapdragon प्रोसेसर, जाणून घ्या
  • India vs Ireland: भारत आयर्लंड या दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतकांसह 253 विकेट घेतल्या
  • आपला होणारा पती केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? धक्कादायक माहिती समोर
  • June 25 Horoscope : घर, पैसा, गाडी, चार राशींच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, वाचा नेमकं काय काय होणार?
  • ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in