• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs Ireland: भारत आयर्लंड या दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतकांसह 253 विकेट घेतल्या

June 24, 2026 by admin Leave a Comment


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू दोन देशांसाठी क्रिकेट खेळले आहेत. काही खेळाडूंनी एका देशात क्रिकेटचे धडे गिरवले आणि संधी न मिळाल्याने दुसऱ्या देशाकडून खेळले. अशी बरीच उदाहरण क्रिकेटमध्ये आहेत. अशाच एका खेळाडूची आयर्लंड दौऱ्यापूर्वी चर्चा रंगली आहे. कारण हा खेळाडू भारत आयर्लंड या दोन्ही देशांसाठी खेळला आहे. या खेळाडूचं नाव आहे एमवी नरसिम्हा राव… एमी नरसिम्हा राव यांचा जन्मा आंध्र प्रदेशच्या सिकंदराबादचा आहे. त्यांनी भारतात प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळल्यानंतर आयर्लंडला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. एमी नरसिम्हा राव यांचा रेकॉर्ड कसा होता.

एमी नरसिम्हा राव यांचं करिअर

एमी नरसिम्हा राव हे एक अष्टपैलू खेळाडू होते. मधल्या फलंदाजी आणि त्यासोबत फिरकी गोलंदाजी करायचे. एमी नरसिम्हा राव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 जानेवारी 1979 मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. पण अवघ्या दहा महिन्यात त्यांचं क्रिकेट करिअर संपलं. त्यांनी भारतासाठी चार कसोटी सामने खेळले. यात 46 धावा आणि तीन विकेट काढल्या. असं असलं तरी देशांतर्गत आणि फर्स्ट क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 108 सामन्यात 40.71 च्या सरासरीने 4845 धावा केल्या. यात 9 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश होता. तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये 253 विकेट घेतल्या आहेत. आयर्लंडकडे खेळाडूंची कमतरता असल्यामुळे एमी नरसिम्हा राव यांनी 1995 मध्ये नॉर्थॅम्पटनशायर विरुद्धच्या सामन्यात आयर्लंडकडून भाग घेतला होता.

एमी नरसिम्हा राव यांना वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा

एमी नरसिम्हा राव हे भारत आणि आयर्लंड सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यांना सर्वाधिक आतुरता ही वैभव सूर्यवंशीची आहे. टी20 मालिकेत पदार्पणासोबत त्याच्या आक्रमक खेळ पाहण्यास एमी नरसिम्हा राव उत्सुक आहेत. एमी नरसिम्हा राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, बेलफास्ट स्टेडियम छोटं आहे. तिथे फक्त 7000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. पण वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहण्यासाठी तिथल्या स्टेडियमची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. युरोपच्या इतर भागातून लोकं बेलफास्टला त्याचा खेळ पाहण्यासाठी येत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in