• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा

June 2, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मित्र कसे असावेत? आणि कसे असू नयेत? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य म्हणतात माणसाने संगत ही खूप विचारपूर्वकच केली पाहिजे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करतात तेव्हा त्याचे परिणाम हे तुमच्या आयुष्यावर दीर्घकाळापर्यंत पडणार असतात. त्यामुळे व्यक्तीने मैत्री करताना नेहमी सावध असलं पाहिजे. या जगात असे तीन लोक आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही मैत्री केली तर त्यांची संगत तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुमचं आयुष्या देखील उद्ध्वस्त होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

धोकेबाज मित्र – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला वारंवार खोट बोलण्याची सवय असते, किंवा जो व्यक्ती दुतोंडी असतो, अशा लोकांसोबत तुम्ही कधीही मैत्री करू नका. जर तुम्ही अशा लोकांसोबत मैत्री केली तर आयुष्यात तुम्हाला मोठा पश्चताप करावा लागेल, असे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी धोका देतील याचा काही नियम नाही, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहावं.

जुगारी मित्र – चाणक्य म्हणतात ज्या माणसाला जुगारीचं व्यसन असतं, असे व्यक्ती स्वत: तर बरबाद होतातच परंतु आपल्या मित्रांना देखील बरबाद करतात. लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु वाईट गोष्टी माणूस लगेच शिकतो, त्यामुळे कधीही जुगारी मित्रांची संगत करू नका, त्यांच्यापासून चार हात दूरच राहा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वार्थी लोक ओळखता आले पाहिजेत, जर तुम्हाला स्वार्थी लोक ओळखता आले नाहीत, तर त्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. असे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून थोडं दूरच रहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in