• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : हे तीन लोकच तुमच्या आयुष्यात अपयशाचं कारण बनतात, अशा लोकांपासून कायम दूर रहा

June 11, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. तसेच काय चांगलं आणि काय वाईट याची जाणीव देखील करून देतात. चाणक्य म्हणतात कुटुंबात एखादा व्यक्ती जर अवगुणी असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाच वाटोळं होतं, हे सांगण्यासाठी ते एक उदाहरण देतात. चाणक्य म्हणतात ज्या प्रमाणे एखाद्या वाळलेल्या लाकडाला आग लागली तर ती आग संपूर्ण जंगलात पसरून पूर्ण जंगल देखील नष्ट होऊ शकते. त्याचप्रमाणे कुटुंबात एखादा व्यक्ती अवगुणी असेल तर त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट होऊ शकते. मात्र दुसरीकडे कुटुंबातील एखादा व्यक्ती गुणी असेल तर तो आपल्या गुणांमुळे संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करतो. अशाच प्रकारे समजात देखील काही अवगुणी व्यक्ती असतात, अशा व्यक्तींपासून तुम्ही कायम सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मूर्ख व्यक्तींपासून दूर रहा – आर्य चाणक्य म्हणतात माणसाने आयुष्यात कधीही मूर्ख लोकांसोबत मैत्री करू नये. जर तुम्ही अशा लोकांसोबत मैत्री केली तर एक न एक दिवस असे लोकं तुम्हाला अडचणीत आणतात. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अशा लोकांना कधीही सल्ले देऊ नका आणि त्यांच्याशी मैत्री देखील करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

इतरांची निंदा करणाऱ्या लोकांपासून सावधान – चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्यासमोर इतरांची निंद किंवा बदनामी करतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका, या लोकांना तुमच्यापासून चार हात दूरच ठेवा, कारण हे लोक इतरांची तुमच्यासमोर निंदा करतात, आणि त्यांना जसा वेळ मिळतो तशी ते दुसर्‍यासमोर तुमची देखील निंदा करतात. या लोकांमुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूरच राहावे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

दृष्ट स्वभावाचे लोक – चाणक्य म्हणतात ज्यांच्या स्वभावामध्येच दृष्टपणा आहे, असे लोक दुसर्‍याचं चांगलं झालेलं कधीही पाहू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावं, अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री केली तर ती तुम्हाला महागात पडू शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा
  • ‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
  • मी लागतो नादाल चल, दाखव काय…, राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in