• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा

June 23, 2026 by admin Leave a Comment


Lohgad Ketan Agrawal: पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या बड्या बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता नाट्यमय वळण आले आहे. होणाऱ्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तपास अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. कोणी इतकं कसं क्रूर असू शकतं असा सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे. या विचलीत करणाऱ्या घटनांमुळे समाजमन हादरले आहेत. जवळच्याच व्यक्तीने केतनचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. काय आहे ही घटना?

घटनेला नाटमय वळण

भावी पत्नीसोबत सुखी आयुष्याची स्वप्न त्यानं रंगवली होती. तिच्यासोबत पुढील आयुष्याचं प्लॅनिंग त्यानं आखलं होते. गुरुवारी केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झाला आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय.या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरु झाली आहे. सोबतचं प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली का? याची चौकशी सुरु झाली आहे.

लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक

केतन अग्रवाल हा पिंपरी चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. तो नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येणार होता. लग्नासाठी पॅलेस आणि विमान बुक करण्यात आले होते. या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंब आनंदात होती. पण या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला.

असा लागला सुगावा

गुरूवारी भावी पत्नीसोबत केतन लोहगड येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकिंग आणि फोटोशूट सुरू असताना केतन दरीत कोसळल्याची माहिती पत्नीने दिली. बचाव पथकाने तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील काही व्यक्तींची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांना या घटनेवर संशय आला. त्यानंतर त्यांनी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in