
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. राजा धनानंदच्या राज्यात चाणक्य यांचा अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या मदतीने राजा धनानंदची राजवट उलथून लावून आपल्या अपमानाचा बदला घेतला. या काळात त्यांना जे अनुभव आले, तेच अनुभव चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा कठीण काळ येतो, परंतु अशा परीक्षेच्या काळात माणसाने संयम ठेवणं गरजेचं असतं.
पुढे चाणक्य असंही म्हणतात की अशा काही सवयी असतात, ज्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. या गोष्टीपासून माणसाने दूर राहणंच त्याच्या हिताचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
वाईट संगत – चाणक्य म्हणतात माणसाची संगत ही नेहमी चांगली असावी, जर माणसाची संगत ही चांगली असेल तर माणूस आयुष्यात यशस्वी होतो, परंतु जर माणसाची संगत ही वाईट असेल तर त्याचं आयुष्य उद्ध्वस होतं.
व्यसन – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच असतं. यामुळे माणसाचा मोठा घात होऊ शकतो. व्यसनावर प्रचंड पैसा खर्च होतो. माणसाचं घराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे माणसाने व्यसन टाळलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
थोरा-मोठ्यांचा अपमान – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, अशा लोकांचा आपण कायम मान ठेवला पाहिजे, त्यांच्या अनुभवातून आपण शिकलं पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply