• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून कायम दूरच राहा, आयुष्याचं कल्याण होईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

June 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं, आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात तीन गोष्टी अशा आहेत, ज्या गोष्टींपासून मानसाने कायम दूर राहिलं पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. केवळ तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त होत नाही, तर तुमचं आख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. मात्र तुम्ही जर या गोष्टींपासून दूर राहिलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

दुसऱ्याचं धन – चाणक्य म्हणतात माणसाने आयुष्यात कष्ट करावेत, कष्ट करून तुम्हाला हवं तेवढं धन कमवा, संपत्ती कमवा. आयुष्य आनंदात जगा. परंतु कधीही दुसऱ्याच्या धनावर, संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका, तुम्ही एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून जर धन कमावलं तर ते फार काळ टिकत नाही, आणि तुम्हाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे.

पर स्त्री – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी आपल्या पत्नीसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. परस्त्री ही नेहमी मातेसमान असते. जर घरात तुमची पत्नी असताना देखील तुमचं पाऊल समाजात वाकडं पडलं तर तुमचं आख्ख आयुष्य बरबाद होण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.

संगत – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी वाईट लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण वाईट गोष्टी माणूस लगेच शिकतो, परंतु चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागते. जर तुमची संगत चुकीची असेल तर तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in