• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या चुका कधीच करू नका, अन्यथा तुमचा पैसाच बनेल तुमचा शत्रू, चाणक्य काय सांगतात?

June 18, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीने आपल्याजवळ असलेल्या पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, त्याचं जर तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन करता आलं तर तुम्ही रंकाचा राव बनू शकतात. परंतु जर तुमचं पैशांचं नियोजन चुकलं तर तुम्ही कितीही श्रीमंत असाल, कालांतराने तुमच्याजवळील सर्व पैसा आपोआप नष्ट होतो. त्यामुळे तुम्हाला पैशांचं योग्य नियोजन करता येणं गरजेचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की अशा काही गोष्टी असतात जेव्हा आपलाच पैसा आपला शत्रू बनतो. चला तर मग जाणून घेऊयात नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये पैसा माणसाचा शत्रू बनतो आणि त्याबद्दल चाणक्य यांनी काय सांगितलं आहे?

अति पैसा – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अतिपैसा होतो, तेव्हा हाच पैसा त्याचा शत्रू बनतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अति पैसा होतो, तेव्हा तो सारासार विचार करण्याची ताकद गमावून बसतो. त्याला त्याच्याकडे असलेल्या पैशांचा गर्व होतो, तो अशा वेळी काही चुकीची काम देखील करतो, त्यामुळे भविष्यात तो अडचणीत येऊ शकतो. तसेच जर हातात गरजे पेक्षा जास्त पैसा आला तर अशा व्यक्तीला वाईट संगत देखील लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे असलेला पैसा हा तुमचा शत्रू बनतो.

अनावश्यक गोष्टींवर खर्च – चाणक्य म्हणतात तुम्हाला गरज आणि अनावश्यक खर्च यातील फरक ओळखता आला पाहिजे. परंतु जेव्हा तुम्हाला गरज आणि अनावश्यक खर्च यातील फरक ओळखता येत नाही, आणि तुम्ही सतत गरज नसताना देखील पैसा खर्च करत जातात अशावेळी तुमच्या हातात असलेला पैसा हा तुमचा शत्रू बनतो.

उपयोग – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, परंतु तो जर तुमच्या योग्यवेळी उपयोगात आला नाही, तर असा पैसा हा तुमच्या शत्रू सारखा असतो. त्यामुळे पैशांचं योग्य नियोजन हे अधिक गरजेचं असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in