• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको

April 16, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? आपलं आयुष्य कसं जगावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांचे हे विचार आजही अनेकांना जगण्याचं बळ देतात. चाणक्य म्हणतात आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचं महत्त्व कळत असूनही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तर काही गोष्टींकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं. मात्र या गोष्टी आपल्या आयुष्यात एवढ्या महत्त्वाच्या असतात की आपलं त्यामुळे भविष्यात सर्वात मोठं नुकसान होतं. एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टी आपण परत मिळू सुद्धा शकत नाहीत, त्यामुळे आपल्यावर पश्चातापाची वेळ येते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात संगत ही सर्वात महत्त्वाची असते, तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात, त्यावर तुमचं भविष्य कसं असणार हे ठरतं. तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल तर नक्कीच तुमचं भविष्य हे चांगलं असेल. परंतु तुम्ही जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर मात्र तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षण – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे शिक्षण जर तुम्ही सुशिक्षित असाल तर तुम्ही नक्कीच प्रगती कराल. परंतु जर तुम्ही शिक्षण घेण्याच्या वयामध्ये शिक्षण घेतलं नाही, शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. शिक्षण नसेल तर तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकत नाही, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वेळ – चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात जास्त काही मौल्यवान असेल तर ती म्हणजे वेळ, ज्या व्यक्तींना वेळेचं महत्त्व माहीत असतं, त्या लोकांचा या जगात कधीही पराभव होऊ शकत नाही. त्यामुळे वेळेकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे माणसाने कधीही आळस करू नये. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 बॉल, 6 सिक्स, द्विशतक करत विराटचा रेकॉर्ड ब्रेक, आता मुंबईसाठी डेब्यू, कोण आहे मयंक रावत?
  • विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं
  • ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा; श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष होणार अधिक तीव्र
  • Iran-US conflict : इराणची विनाअट माघार, शेवटी ट्रम्प जिंकलेच, अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
  • स्वयंपाकघरात इंडक्शन कुकटॉप्स ठेवण्याआधी ‘हे’ 4 वास्तू नियम जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in