• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, होईल मोठा घात, चाणक्य काय म्हणतात?

July 3, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांबाबत जाणीव करून देतात. एवढंच नाही जर तुमच्यावर एखादं संकट आलं तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं? संकटाचा सामना कसा करावा याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता कामा नये, कारण तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एक दिवस तुम्ही मोठ्या संकटात सापडाल, त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही? हे तुम्ही वेळीच ओळखलं पाहिजे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नव्याने मैत्री करता, तेव्हा त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका, मैत्रीला थोडा वेळ द्या आणि नंतर निर्णय घ्या असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच चाणक्य पुढे असंही म्हणतात समाजात अशा काही गोष्टी असतात, ज्यांच्यावर कधीही विश्वास ठेवता कामा नये, अशा गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे.

नखे असलेले प्राणी – चाणक्य म्हणतात ज्या प्राण्यांना तीक्ष्ण नख असतात, जसं वाघ, सिंह, मांजर, कुत्रा या प्राण्यांपासून माणसाने नेहमी सावध राहावं, अशा प्राण्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये, कारण अशा प्राण्यांवर तुम्ही जर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमचा कधी घात होईल हे सांगता येत नाही, तुमचा मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यामुळे अशा प्राण्यांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

शिंगे असलेले प्राणी – चाणक्य म्हणतात ज्या प्राण्यांना शिंगे आहेत, अशा प्राण्यांपासून देखील नेहमी सावध राहिला पाहिजे, जसं की गाय म्हैस, हे प्राणी सामान्यपणे पाळीव असतात. परंतु तरी देखील कधी-कधी घात होऊ शकतो. त्यामुळे अशा प्राण्यांपासून नेहमी सावध राहावं, योग्य ते अंतर ठेवावं .अशा प्राण्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात नखे असलेले प्राणी आणि शिंगे असलेले प्राणी या दोन्हींपेक्षा हे लोक अधिक धोकादायक असतात, ते तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून चार हात दूर राहण्यातच तुमचं हीत आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया अन् चेतन कोड वर्डमध्ये काय बोलले? तो फोन पोलिसांकडून जप्त
  • IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या
  • Airtel : 41 कोटी ग्राहकांसाठी गुड न्यूज, 200 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G अन् बरंच काही
  • Aamir Khan Wedding : निकाह की सप्तपदी.. आमिर खान- गौरी स्प्रॅटचं कसं होणार लग्न ?
  • या प्राण्याच्या रक्तापासून बनवला जातो सापाच्या विषाचा उतारा, तुम्हाला माहितीये का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in